शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतून दीड काेटी लुटणाऱ्या चौघांच्या अटकेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले.

ठळक मुद्देफिर्याद ८९ लाखांची : आकडा आणखी वाढण्याचा अंदाज, ‘लाभा’चे नेमके ‘वाटेकरी’ किती आणि कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणात आधी निलंबन कारवाई व बुधवारी उशिरा रात्री फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने आता अपहार करणाऱ्या आरोपींच्या अटकेची तेवढी प्रतीक्षा आहे. आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या आरोपींच्या मुसक्या केव्हा आवळतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले. आता त्यांच्या अटकेची फसवणूक झालेल्या खातेदारांना प्रतीक्षा आहे. यातील तिघांना आधीच निलंबित केले गेले होते, तर अंकितची सेवा कंत्राटी असल्याने संपुष्टात आणण्यात आली. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानेरक्कम सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी खातेदारांची गर्दी होत आहे. गुरुवारीही बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. बँकेबाहेर खातेदारांना रांग लावावी लागली. फिर्याद ८९ लाखांच्या अपहाराची दिली गेली असली तरी प्रत्यक्षात गुरुवारीसुद्धा आणखी डझनभर खातेदारांनी तक्रारी केल्या. त्यांच्या तक्रारीनुसार ११ लाख १० हजारांच्या रकमेचा अपहार झाल्याचा आकडा जुळतो आहे.  गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ७० तक्रारी बॅंकेला प्राप्त झाल्या असून त्यात सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम गहाळ असल्याचे आढळून आले, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. आणखीही तक्रारी बँकेला प्राप्त होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. कारण बँकेत पोत्यामधून रोकड घेऊन येताना काही चेहरे दिसतात. सीसीटीव्हीमध्येही संचालक मंडळाने त्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आरोपी बनविले  जावू शकते.  जिल्हा बँक अध्यक्षांनी शब्द पाळला आर्णी शाखेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. संचालक मंडळ बैठकीतही एका-दोघांचा विरोध झुगारून संबंधित तिघांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. केवळ निलंबनावरच कारवाई थांबणार नसून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा कोंगरे यांनी केली होती. अखेर बुधवारी गुन्हे दाखल झाले आणि कोंगरे यांनी आपला शब्द खरा केला. गुन्हे दाखल व्हावे म्हणून त्यांनी काही अनुभवी संचालकांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना तीव्रता पटवून दिली.  

आरोपींचे बॅंक खाते, लाॅकर ‘सील’ करण्याचे आदेश आर्णी शाखेतील गैरव्यवहाराचे प्रकरण केवळ निलंबन व फौजदारीवर थांबणार नाही, तर खातेदारांचा एक-एक रुपया त्यांना परत केला जाईल, त्यासाठी आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यातून ही वसुली केली जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गहाळ रक्कम चौघांकडूनही वसूल करायची असल्याने त्यांची सर्व बँक खाती सील करण्यात आली आहेत. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना त्याबाबत पत्र देण्यात आले. या चौघांनाही आर्णी शाखेत येण्यास मनाई असून, ते आल्यास त्यांच्यावर कायम वॉच राहणार असल्याचेही कोंगरे यांनी सांगितले. हा गैरव्यवहार आर्णी शाखेपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे इतर शाखेच्या खातेदारांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या रकमा सुरक्षित असल्याचे प्रा. टिकाराम कोंगरे यांनी स्पष्ट केले. 

‘लोकमत’चा दणका आर्णी शाखेतील लाखो रुपयांचा गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या वृत्तमालिकेमुळे नागरिकांना आपल्या खात्यातील रकमा गहाळ झाल्याचे कळले. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच या गैरव्यवहारातील दोषींचे निलंबन व त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकली. आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्तेची जप्ती, त्यातून वसुली व खातेदारांचे गेलेेले पैसे परत मिळेपर्यंत ‘लोकमत’चा हा पाठपुरावा कायम राहणार आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार - जाधव आर्णीचे ठाणेदार पितांबरराव जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आर्णी शाखेतील ८९ लाखांच्या अपहाराचा तपास सध्या माझ्याकडे आहे. परंतु आर्थिक गुन्हा असल्याने व त्याची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल. आरोपी अद्याप अटक नसून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. 

संचालक पोलीस अधीक्षकांना भेटले आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी फिर्याद दाखल करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम काेंगरे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांची भेट घेतली. अशा प्रकरणात पोलीस सहसा ऑडिट रिपोर्टची मागणी करतात व नंतरच गुन्हा दाखल करतात. परंतु, आर्णी प्रकरणात प्राथमिक अंकेक्षण अहवालावरून गुन्हा नोंदविण्याची विनंती करताना एसपींना या प्रकरणाची व्याप्ती पटवून देण्यात आली. त्यानुसार, फिर्याद येताच तत्काळ गुन्हा नोंदविला गेला. या शिष्टमंडळात बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी अध्यक्ष मनीष पाटील, संचालक राजुदास जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी