शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख चिमुकल्यांची प्रतीक्षा संपली, पहिलीचेही वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग पावणेदोन वर्षापासून घरातच बंदिस्त झालेल्या पहिली-दुसरीच्या  चिमुकल्यांसाठी खुशखबर आहे. येत्या बुधवारपासून प्राथमिक शाळेचे वर्गही ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १४  हजार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वर्गमित्रांच्या गोतावळ्यात रममाण होण्याची संधी मिळणार आहे. सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचे सर्वच वर्ग बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सध्या हे वर्ग बंद असले तरी दररोज शिक्षकांची शाळेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता बुधवारपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे. 

आश्रमशाळांचा मात्र निर्णय नाही - राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य मंडळाच्या शाळांमधील प्राथमिकचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. त्यासोबतच सीबीएसई शाळांचेही वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, आश्रमशाळांमधील प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत आदिवासी विकास विभाग, तसेच समाजकल्याण विभागाच्या स्वतंत्र निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.

वसतिगृहांचा निर्णय कधी होणार ? - पहिलीपासूनचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग आधीच सुरू झाले आहे. मात्र एसटीचा संप आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शासन आदेशानुसार वर्ग सुरू करण्याची आपली सर्व तयारी झाली आहे. या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांना सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे पालन करावे लागेल. आपल्या सर्व शाळा यापूर्वीच सॅनिटायइझ झाल्या आहेत. तरीही हात धुण्यासाठी प्रत्येक शाळेत साबण व पाण्याची व्यवस्था केली आहे. तापमापी, पल्स ऑक्सिमीटर ठेवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. -प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्राथमिक

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या