शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.

ठळक मुद्दे४८९ मतदार : सात मतदान केंद्र, महाविकास आघाडी-भाजपात थेट लढत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असून शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी त्याकरिता मतदान घेतले जाणार आहे.प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. चार अपक्षांनीही या रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांना हा उत्साह अखेरपर्यंत टिकविता आला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि १६ पंचायत समित्यांचे सभापती असे मिळून एकूण ४८९ मतदार या मतदारसंघात आहे. उपविभागीय मुख्यालय असलेल्या सात ठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहेत. शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात होईल. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.विधान परिषदेच्या रिंगणातील या दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी आपल्याकडे तीनशे पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा केला आहे. यापैकी कुणाचा दावा खरा ठरतो हे ४ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशा तीन पक्षांचे मतदार सांभाळताना महाविकास आघाडीचे नेते वनमंत्री संजय राठोड यांची कसरत होताना पहायला मिळत आहे. भाजपची कमांड माजी राज्यमंत्री तथा यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या हाती आहे. भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाचे व समर्थक मतदारांना एकसंघ ठेवण्यासोबतच अन्य पक्षातील काठावरच्या व अस्थिर मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱ्यापैकी त्यांना यश आल्याचेही सांगितले जाते.दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपले मतदार दुसºयाच्या गळ्याला लागू नये म्हणून खास खबरदारी घेतली आहे. त्यासाठी बहुतांश मतदारांना राज्याबाहेर देवदर्शन व पर्यटनाला पाठविण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी हे मतदार यवतमाळात परतणार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला आहे. अर्थकारणातून दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. क्रॉस व्होटींग सिद्ध करणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने दोन्ही बाजूकडून पक्षाच्या अधिकृत मतदारांना क्रॉस व्होटींगसाठी जोर दिला जात आहे.अवैध मतदान, क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हानविधान परिषदेच्या या निवडणुकीत अवैध ठरणारे मतदान आणि क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हान दोन्ही उमेदवारांपुढे प्रकर्षाने राहणार आहे. त्यातही महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने त्यांच्यापुढील हे आव्हान आणखी गडद आहे. अवैध मतांचा फटका उमेदवारांंना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद