शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बालभारतीने ‘व्हर्च्युअल कनेक्ट’ केलेली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित करणारे ठरत आहे. शाळा डीजिटल करण्यासाठी या खेड्यातील गोरगरीब पालकांनी चक्क एक लाख रुपयांची वर्गणी गोळा करून दिली.

ठळक मुद्देमारेगाव कोरंबीच्या गुणवत्तेची घोडदौड : आपसात इंग्रजी संभाषण सहज करणारे विद्यार्थी ठरले आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गम खेड्यातील विद्यार्थी म्हणजे मळकटलेले कपडे आणि दुर्मुखलेले चेहरे एवढेच चित्र पांढरपेशा शिक्षण तज्ज्ञांच्या नजरेपुढे तरळत असते. मात्र हा अपसमज पूर्णपणे पुसून टाकण्यात मारेगाव कोरंबी या छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेने यश मिळविले आहे. या शाळेची गुणवत्ता पाहून पुण्याच्या बालभारतीने ‘व्हर्च्युअल क्लासरुम’चे साहित्य देऊन ही शाळा राज्यातील विविध नामांकित शाळांसोबत कनेक्ट केली आहे. त्यामुळे मारेगावच्या विद्यार्थ्यांना राज्यातील इतरही दर्जेदार शाळांमधून थेट मार्गदर्शन मिळण्याचे दालन खुले झाले आहे.मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित करणारे ठरत आहे. शाळा डीजिटल करण्यासाठी या खेड्यातील गोरगरीब पालकांनी चक्क एक लाख रुपयांची वर्गणी गोळा करून दिली. आता विविध शैक्षणिक अ‍ॅप हाताळून येथील विद्यार्थी आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेत आहे. पूर्वी अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी डीजिटल साहित्यामुळे आता अधिक उत्सुकतेने आणि निसंकोचपणे अध्ययनात सहभाग घेत आहे. पहिली, दुसरीचे विद्यार्थी कोट्यवधीच्या संख्यांचे गुणाकार सहज करून दाखवितात. हे पाहून पालकच नव्हे तर शिक्षण विभागाचे अधिकारी देखील शाबासकीची थाप देऊन जातात.गृहपाठाचीही वेळ निश्चितशाळेसोबतच विद्यार्थ्यांच्या गृहपाठाचेही येथे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते १० हा एक तास गृहपाठासाठी राखीव करण्यात आला आहे. या तासात पालकही पोरांसोबत असतात.शाळेची गुणवत्ता पाहून या शैक्षणिक सत्रात १३ विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेन्टमधून मारेगावच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहे. खासगी शाळांप्रमाणेच येथेही पालकांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करून पालकांना नियमित शाळेच्या संपर्कात ठेवण्यात शिक्षकांना यश आले आहे.२१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ग्रामीण मुलांना सक्षम करण्यावर आमच्या शाळेचा भर आहे. त्यासाठी न्यूनगंड दूर करून प्रथम विद्यार्थ्यांना बोलके केले.- अरविंद गांगुलवार, मुख्याध्यापकग्रामीण शाळा शहरांपेक्षा कमी नाही हे आमच्या शिक्षकांनी सिद्ध केले. शाळेतील विविध उपक्रमांमुळे आमच्या विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती वाढत आहे. शाळा समितीही सक्रिय राहून शाळेच्या अडचणी सोडवित आहे.- मोहनराव कुचनकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.दोन वर्षापूर्वी गुणवत्तेचा मागमूसही नसलेल्या या शाळेला नवे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नवे रुप दिले. पालक म्हणून आम्हाला या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान आहे.- अविनाश टोंगे, पालकविद्यार्थ्यांना आव्हानगटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनातून मारेगावच्या शाळेत ‘विद्यार्थ्यांना आव्हान’ देण्याचा नवाच उपक्रम उपयुक्त ठरला. अभ्यासातील हे आव्हान पूर्ण करताना विद्यार्थी प्रत्येक विषयात तरबेज होत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा