शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

आसोला गावाला साडेचार वर्षांपासून सरपंचच नाही

By admin | Published: December 22, 2014 10:56 PM

सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही.

नेर : सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही. लोकांना मात्र आपली कामे करून घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे तर दुसरीकडे गावाच्या विकासाचे तीनतेरा वाजले आहे. यवतमाळ तालुक्यात मात्र नेरपासून जवळ असलेल्या या गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक २०१० मध्ये झाली. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले. परंतु आरक्षित पदासाठीचा उमेदवार नव्हता. माणिक राठोड, सुभद्रा जयस्वाल, प्रवीण जयस्वाल, दत्ता आडे, विनोद जाधव, उषा राठोड, सुमित्रा राठोड हे सदस्य म्हणून निवडून आले. यातील एकही सदस्य राखीव पदासाठी निवडून आलेला नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या पदासाठी उमेदवार असतानाही प्रशासनाने निवड प्रक्रिया घेतली नाही. गेली साडेचार वर्षांपासून या गावाचा कारभार सरपंचाशिवाय सुरू आहे. विकास कामांना खीळ बसला आहे. शिवाय नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे. सरपंच निवडीच्या कार्यक्रमासाठी तहसीलने जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे क्रमप्राप्त होते. मात्र गेली साडेचार वर्षात तहसीलने ही बाब ध्यानातच घेतली नाही. यावरून येथील तहसील कार्यालयाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)