लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहराच्या वैभवात भर घालणारा आणि शहराची ऐतिहासिक धरोहर असलेल्या आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट उंची) तिरंगा झेंडा (राष्टÑध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा तिरंगा लावला जाणार असून त्यासाठी त्यांच्या खासदार निधीतून ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या तिरंगा झेंडाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिकेने स्वीकारली आहे.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात यवतमाळच्या आझाद मैदानाला अनन्य साधारण महत्व आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांच्या सभा याच आझाद मैदानावर झाल्या. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी याच मैदानावरून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले होते. अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या आझाद मैदानावर स्वातंत्र्य लढ्याची साक्ष देणारा जयस्तंभ आहे. देशभक्तीचे हे प्रतीक आणखी प्रेरणादायी करण्यासाठी येथे सर्वात उंच तिरंगा झेंडा बसविण्याचा मानस विजय दर्डा यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी खासदार निधीतून तत्काळ ५२ लाख रुपये उपलब्ध करून दिले. याला प्रशासकीय स्तरावर मंजुरीसुद्धा मिळाली होती. मात्र देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारण्यावरून काम रखडले होते. यासाठी नगरपरिषदेला देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घ्यावी, असे पत्र देण्यात आले होते. झेंड्याचा प्रस्ताव मिळताच नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांनी या प्रस्तावाचा सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत समावेश केला. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड यांनी तिरंगा झेंड्याचे महत्व सांगितले. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी सहमती दर्शविल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला. आता लवकरच यवतमाळच्या आझाद मैदानावर तिरंगा झेंडा बसविण्याच्या कामाला गती येणार आहे. या झेंड्याच्या देखभालीसाठी पालिकेला होमगार्ड, एनसीसी बटालियनची मदत घेता येऊ शकते.शहराच्या वैभवात भरयवतमाळच्या वैभवात भर घालणारा तिरंगा झेंडा लवकरच आझाद मैदानावर डौलाने फडकणार आहे. देशप्रेमाची साक्ष देणारा आणि सामाजिक संदेश देणारा हा ध्वज तरुण पिढीला प्रेरणादायी असाच राहणार आहे. माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून साकारला जाणाºया या ध्वजासाठी यवतमाळ नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून राष्टÑभक्तीचा परिचय दिला.
आझाद मैदानात विदर्भातील सर्वात उंच तिरंगा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:19 IST
यवतमाळ शहराच्या वैभवात भर घालणारा आणि शहराची ऐतिहासिक धरोहर असलेल्या आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट उंची) तिरंगा झेंडा (राष्टÑध्वज)
आझाद मैदानात विदर्भातील सर्वात उंच तिरंगा झेंडा
ठळक मुद्देनगरपरिषदेत मान्यता : विजय दर्डा यांच्या खासदार निधीतून ५२ लाख