शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दुभाजकावरील पथदिव्यांनी घेतला कंत्राटदाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:55 PM

आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देआर्णी मार्गावरील घटना । उघड्या केबलवर पाय पडल्याने विजेचा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.मोहन कृष्णराव कावरे (४०) रा. शांतीनगर वडगाव असे या कंत्राटदाराचे नाव आहे. मोहन कावरे हे बांधकाम मटेरियल सप्लायर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या घरी कलरिंगचे काम सुरू होते. कलर विकत घेण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका दुकानात जाण्यासाठी निघाले. त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले रेलिंग पार करण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांचा पाय उघड्या पडलेल्या वीज केबलवर पडला. काही काळ एकाच जागी उभे असल्याचे लक्षात येताच परिसरातील लोकांनी काठीने कावरे यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या पायाखाली जिवंत विद्युत केबल उघडी पडल्याचे दिसून आले. कावरे यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कावरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.दुभाजकाच्या मधोमध पथदिवे लावण्यात आले आहे. यासाठी केबल टाकली आहे. हे काम पूर्ण होण्याअगोदरच केवळ निवडणूक काळात झगमगाट दाखविण्यासाठी त्यातून विद्युत प्रवाह सोडण्यात आला.राजकीय स्वार्थासाठी विकास दाखविण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदारावरही कोणाचेच नियंत्रण नाही. गुणवत्तेपेक्षा चमकोगिरीला महत्व आल्याने याची मोठी किंमत अशा अपघातातून मोजावी लागली.दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी वडगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली. यावेळी प्रवीण देशमुख, अरुण राऊत, संजय लंगोटे, बालू पाटील दरणे, विजय काळे, राजू केराम, राजू गिरी, अनिल गायकवाड, कैलास बावणे, सय्यद जाकीर, विजय बडगे, विनोद रोकडे, अमजद पठाण, संदीप कुचनकर, विनायक बोंद्रे, विजय काळे, नरेश ढोले, दिनेश गोगरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू