लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उत्पादनात विक्रमी घट, ढिसाळ नियोजन, वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत असलेले वेकोलि वणी नॉर्थचे महाप्रबंधक उमेशचंद्र गुप्ता यांची सोमवारी उचलबांगडी करण्यात आली. वेकोलि मुख्यालय नागपूर येथील मूळ पदावर गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. वेकोलि वणी क्षेत्राचे जीएम (ऑपरेशन) मलीरेड्डी संजीवारेड्डी यांच्या नियुक्तीचे आदेश कार्मिक महाप्रबंधक (वेकोलि) अजयकुमार सिन्हा यांनी काढले. लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित करून वेकोलि वणी नॉर्थमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणला होता.
एकेकाळी कोळसा उत्पादनाच्या उच्चांकी वाटचालीने वेकोलित तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वेकोलि वणी नार्थ क्षेत्राने गेल्या १० महिन्यांत उत्पादनात आपले लक्ष्य निम्मेही पूर्ण करू शकले नाही.
वेकोलि वणी नॉर्थच्या उत्पादनात दोन दशकांहून अधिक काळ प्रथमच एवढी मोठी लक्षणीय घट झाली आहे. वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राला २०२४-२५ यावर्षी कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ५२ लक्ष टन देण्यात आले आहे.
मुख्यालयाने वणी नॉर्थला वाऱ्यावर सोडले
- विशेष म्हणजे अडीच दशकांपासून वेकोलिची मान उंचावणाऱ्या वणी नॉर्थ क्षेत्राने यावर्षी उत्पादनासह सर्वच बाबतीत कमालीचा हलगर्जीपणा दाखविला.
- हा हलगर्जीपणा सातत्याने ३ निदर्शनास येत असताना वेकोलि मुख्यालयाने एवढी सुमार कामगिरी करणाऱ्या वणी नॉर्थला वाऱ्यावर सोडले की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
- महाप्रबंधक गुप्ताविरुद्ध वेकोलि 3 सीएमडीकडे अनेक तक्रारी होत्या. तसेच यवतमाळ-वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी नुकतेच वेकोलिचे अध्यक्ष प्रबंधक निर्देशकांना एक पत्र लिहीले होते.
- वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.