शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:46 IST

घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला.

ठळक मुद्देगाय होरपळली : पाठलाग करताना घोन्सालगत घडली दुर्घटना, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला. मात्र पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाहनातील जनावरांना सुखरूप बाहेर काढले असले तरी त्यातील एक गाय मात्र गंभीररित्या होरपळली. ही दुर्घटना गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रासा ते घोन्सा दरम्यानच्या एका वळणावर घडली.विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या गोरक्षणात जनावरे चोरण्याचा प्रयत्न झाला. हे चोरटे वणी येथीलच असल्याची शंका व्यक्त केली जात असून पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत. घोन्सा येथे श्रीराम गोरक्षण ट्रस्ट नावाची संस्था असून या संस्थेत तस्करीतून जीवदान मिळालेल्या जनावरांना आश्रय दिला जातो. या गोरक्षणात जवळपास १२५ जनावरे आहेत.गोरक्षणाला तारेचे कंपाऊंडदेखील आहे. गुरूवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास काही चोरटे पिकअप वाहनासह गोरक्षण परिसरात आले. कंपाऊंडचे तार कापून त्यांनी गोरक्षणात प्रवेश केला. त्यानंतर तेथे बांधून असलेल्या तीन गायी व दोन कालवड अशी पाच जनावरे पिकअप वाहनात बसविली. त्यांना वाहनात निर्दयपणे बांधण्यात आले. या जनावरांना घेऊन हे वाहन घोन्सा मार्गे अदिलाबादकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना या चोरीची भणक गोरक्षणातील कर्मचाऱ्यांना लागताच, त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला.वाहन भरधाव अदिलाबादकडे नेण्यात येत असताना रासा ते घोन्सा मार्गावरील एका वळणावर या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेवरील एका झाडावर सदर वाहन जाऊन आदळले. या अपघातानंतर वाहनातील चोरटे घटनास्थळावरून पसार झालेत. याचवेळी वाहनाने पेट घेतला. ही बाब रात्रीचा भजनाचा कार्यक्रम आटोपून घोन्सा येथे परत जात असलेल्या भजन मंडळातील सदस्यांना दिसली. त्यांनी पुढाकार घेऊन वाहनातील जनावरांना सुखरूप बाहेर काढले. मात्र एक गाय गंभीररित्या जळून जखमी झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे, डी.बी.पथकातील सुधीर पांडे, सुनिल खंडागळे व कर्मचारी घटनास्थळी पोहचले.त्यानंतर वणीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर वाहनाची आग विझविण्यात आली. या प्रकरणी गोरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष नरेश हेमंतराव निकम यांच्या तक्रारीवरून भादंवि ३७९, २७९, ४२९, ३४, प्राणी संरक्षण अधिनियम कायदा, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींची संख्या तीनजनावरे लंपास करण्यासाठी तीन इसम आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर इसम हे वणी शहरातीलच असून यापूर्वीदेखील त्यांनी जनावरांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. जनावरे चोरायची व ती अदिलाबाद येथे नेऊन विकायची, असा या टोळीचा गोरखधंदा आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहनाविना क्रमांकाचे होते.

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हा