शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

वणीचा शिक्षण विभाग झाला पोरका

By admin | Updated: July 1, 2017 01:10 IST

येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन विस्तार अधिकारी शुक्रवारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले.

केंद्रप्रमुखावर डोलारा : तालुक्यातील १५० शाळा वाऱ्यावर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन विस्तार अधिकारी शुक्रवारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता शिक्षण विभागाला कोणीही वाली उरला नाही. त्यामुळे तालुक्यातील १५० शाळा व हजारो विद्यार्थी वाऱ्यावर सोडले गेले आहेत. येथील शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पद कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. कधी विस्तार अधिकारी, तर कधी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रभार सोपवून गाडा ओढला जात आहे. मागील दोन वर्षांपासून तीन विस्तार अधिकारीच येथे कार्यरत आहे. त्यातील प्रकाश नगराळे यांचे काही दिवसांपूर्वीच झरी पंचायत समितीमध्ये स्थानांतर झाले. पांढरकवडा येथून पदस्थापनेवर आलेले सहाय्यक गटविकास अधिकारी इंगोले यांच्याकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार होता. चार महिन्यांपूर्वी ते पांढरकवडा येथे आपल्या मुळ पदावर गेले. मात्र तेसुद्धा शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. शिक्षण विभागाचा संपूर्ण भार मेश्राम व सोयाम या दोन विस्तार अधिकाऱ्यांवर होता. शाळा सुरू झाल्यानंतर पाठ्यपुस्तकांचे वाटप, शाळांमधील विद्यार्थी प्रवेशांच्या अडचणी, शिक्षकांची बदली, ही कामे दारावरच असताना हे दोन्ही विस्तार अधिकारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले. आता शिक्षक विभागाला काही विस्तार अधिकारी नाही. केवळ केंद्रप्रमुख व गटसंसाधन केंद्रातील कंत्राटी साधन व्यक्ती विषयतज्ञ यांच्यावरच शिक्षण विभागाचा डोलारा उभा आहे. झरी येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वणीचा प्रभार देण्यात आल्याचे समजते. झरी ते वणी हे अंतर ४० किलोमीटर आहे. रस्ताही आडवळणाचा आहे. तेव्हा झरीचे हे अधिकारी वणीचा कारभार कसा सांभाळतात, हे न समजण्यासारखे आहे. तालुक्यात १३ केंद्र आहेत. केंद्रप्रमुखांची संख्याही मागील चार वर्षांपासून पुरेशी नाही. केवळ सहाच केंद्रप्रमुख काम सांभाळत आहेत. केंद्र प्रमुखांकडे दोन-तीन केंद्राचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अखत्यारितीतील सर्व शाळांकडे लक्ष ठेवणे अशक्य होत आहे. केवळ माहितीच्या देवाणघेवाणीतच केंद्रप्रमुखांची शक्ती खर्च होत आहे. आता जुलै महिन्यात शाळांची पटसंख्या भरणे, संचमान्यता करणे, शिष्यवृत्तीची कामे आटोपणे, ही महत्त्वाची कामे सुरू होणार आहे. यांपैकी बरीचशी कामे आॅनलाईन करावी लागते. त्यासाठी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर बरीचशी माहिती भरावी लागते. आता ही महत्त्वाची कामे कशी पार पाडली जाणार, याकडे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष लागले आहेत.