शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:46 IST

गुजरात, तेलगंणामधून बियाणे : शेतकऱ्यांच्या डोळ्यात होतेय धूळफेक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बीटी बियाणे थोपविण्यासाठी अनधिकृत विक्रेत्यांनी नामांकित कंपनीच्या नावाचा वापर सुरू केला आहे. याच्या विक्रीसाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात सापडले आहे. 

जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर यावर्षी कापसाची लागवड होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अद्याप ७५ टक्के क्षेत्रावरील लागवड बाकी आहे. तीन लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाची लागवड बाकी आहे. या लागवडीसाठी एचटीबीटी हे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी अनधिकृत विक्रेत्यांनी विविध योजना हाती घेतल्या आहेत.

गावातील सुशिक्षित बेरोजगारांना आणि शेतकऱ्यांना हाताशी धरून ही विक्री केली जात आहे. यामुळे बोगस बीटी बियाण्याची विक्री सुलभ होण्यास मदत झाली आहे. हे बियाणे थेट गावात पोहचविले जात आहे. त्यासाठी आलिशान वाहनांचा, दुचाकीचा आणि मालवाहू गाडीचा वापर केला जात आहे.

१५ लाखांचे बियाणे, खत पकडलेगुजरात आणि तेलंगणा प्रांतातून अवैधरित्या शिरलेले हे बियाणे विविध तालुक्यांत पोहचले आहे. या बियाण्याचे एक हजार ३८ पॅकेट आतापर्यंत पोलिसांनी जप्त केले असले तरी मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले आहे. याशिवाय विक्रीसाठी विविध वाहनाचा वापर केला आहे. १४ लाख ७१ हजार रुपयांचे बियाणे आणि खत या कारवाईत जप्त करण्यात आले. भरारी पथकांनी अवैध बियाणे जप्त करण्यासाठी आतापर्यंत ८ कारवाया केल्या आहेत. २० दिवसांतील या कारवाया सुन्न करणाऱ्या आहेत. यावरून अवैध बियाण्याचे जाळे किती पसरले हे लक्षात येते.

२० दिवसांत आठ कारवायापोलिस प्रशासन आणि कृषी विभागाने सापळा रचून गत २० दिवसांत आठ कारवाया केल्या. यामध्ये सापडेल्या बियाण्याच्या पॉकिटावर नामांकित बियाणे कंपन्याचे नाव टाकले होते. मात्र, याचे पॅकिंग कुठे झाले, त्याचे उत्पादन कुठे झाले. याचे मालक कोण याची कुठलीच माहिती या पॅकेटवर नव्हती. याची किंमत त्याची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिली गेली नाही. यातून शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे. अन्यथा मोठी फसवणूक होण्याचा धोका आहे.

चेकपोस्ट चुकवून शिरतात वाहनेबोगस बीटीवर बंदी आहे. यामुळे अशा बियाण्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या सूचना आहेत. यानंतरही चेकपोस्ट चुकवून ही वाहने राज्यात शिरली आहे. आता ही वाहने गावामध्ये शिरत आहे. यामुळे शासकीय यंत्रणेपुढे आणि पोलिस प्रशासनापुढे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcottonकापूस