शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

जिल्ह्याला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देज्वारी, गहू काळवंडणार : भाजीपाला, हळद उत्पादकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसाने शेत शिवारात मोठे नुकसान झाले आहे. यात हळद, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. सततचे नुकसान होत असताना शेत शिवारातून नुकसानीचा अहवाल अद्यापही पुढे आला नाही. यामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार किंवा नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात या वर्षी खरिपाच्या पेरणीपासूनच कृषी क्षेत्रावर मोठे संकट घोंगावत आहे. खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली. सतत झडी स्वरूपाच्या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवेच्या वेगाने गहू आडवा झाला. पडलेल्या पावसाने गहू काळा पडण्याची दाट शक्यता आहे. असाच फटका रब्बीच्या ज्वारीला बसण्याचा धोका आहे. ज्वारी परिपक्व अवस्थेत आहे. त्या सुमारास पाऊस बरसल्याने ही ज्वारी काळी पडण्याचा धाेका वाढला आहे. मक्याच्या पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड झाली. हळद काढणीच्या अवस्थेत आहे. शेतात हळद शिजविण्याचे काम सुरू आहे. ही हळद शेत शिवारातच वाळू घातली जाते. मधातच पाऊस बरसल्याने हळदीला डाग पडण्याची शक्यता आहे. पावसाने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालेभाज्या सडत आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र नुकसान आले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही झाले नाही.

मजूर टंचाई आणि यंत्राच्या कमतरतेने धोका  जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची पेरणी उशिरा केली होती. त्यामुळे अनेकांचा गहू सोंगणी अभावी शेतातच आहे. या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तर गहू काढणीसाठी अनेकांना मजूर मिळाले नाही. तर अनेक शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसाने हाताशी आलेले पीक उद्‌ध्वस्त केले. गव्हासह हरभरा, आंबा, भाजीपाला या पिकांसह खेड्यातील घरादारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस