लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: बुधवारपासून वणी शहरातील मद्यविक्रीचे दुकान सुरू होताच, शहरातील मद्यशौकीनांची दुकानापुढे मोठी रांग लागल्याचे दृश्य पहावयास मिळाले. यावेळी सामाजिक अंतराचा पार फज्जा उडाला. पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु मद्यप्रेमींची इतकी झुंबड उडाली होती की, पोलिसांनाही या गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. दरम्यान, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या परिसरात पाहणी केल्यानंतर या प्रकारावर संताप व्यक्त केला. सदर दुकानातून नियमबाह्यरित्या दारूची विक्री होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यवतमाळ जिल्ह्यात दारुच्या दुकानापुढे अभूतपूर्व गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:54 IST