एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:04 PM2019-04-20T22:04:22+5:302019-04-20T22:05:11+5:30

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

The unicorned elephant, the tornado appeared and | एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या

एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । पाणीदार गावासाठी सामूहिक प्रयत्न, गुणतालिकेत तासलोट गाव राज्यात अव्वल

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे.
खऱ्या अर्थाने या गावाने ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापन करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला कैलास टेकाम, सुभाष टेकाम, अनिल टेकाम, महादेव मेश्राम यांनी स्पर्धेसंबधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करीत गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे ८६ लोकांची वस्ती असलेल्या या गावात केवळ २१ कुटुंब संख्या आहे. गावातील मोजके जण शेती तर इतर सर्व रोजमजुरी करुन उध्दरनिर्वाह करतात. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात आबालवृध्दांसह सर्व गाव जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने उतरला आहे.
या गावात सी.सी.टी., एल.बी.एस., कँटूर बांध, ग्रेडेड कँटून बांध यासह इतरही कामे उत्कृष्ठ व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केले आहे. त्यामुळे तासलोट हे गाव महाराष्ट्रात गुणतालिकेत अव्वल आहे.
बीडीओंच्या प्रोत्साहनाने उत्साह
गावे पाणीदार व्हावी यासाठी गटविकास अधिकारी सुशिल संसारे पुढे सरसावले आहे. बहुतांश वेळ गावकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात ते घालवित आहे. आज त्यांनी तासलोट येथे सहपरिवार, कर्मचारी व नागरिक अशोक उमरतकर, मुरलीधर नाईक, देवेंद्र पडोळकर, रवींद्र गावंडे, अमोल तायडे, स्मिता ठाकरे, विजय चव्हाण, सुमन नेवारे, अलका गारोडे, कीर्ती चिचाणे यांच्यासह श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले.
अपंग व्यक्तीचे श्रमदान सर्वांना ऊर्जा देणारे
लक्ष्मी बापूराव टेकाम ही महिला दोनही हाताने पूर्ण अपंग आहे. त्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. त्यांच्यापासून लोकांनाही आपसूकच प्रेरणा मिळते. एक अपंग महिला मेहनत करू शकते तर आपण का नाही, अशी भावनाही यानिमित्ताने अनेकांच्या मनात जागृत झाली आहे. या उपक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी आहेत.

Web Title: The unicorned elephant, the tornado appeared and

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.