शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

काका, मला दररोज शाळेत येऊ द्या ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

आर्थिक परिस्थिती नाही, शाळेत जाण्याचे वयही नाही.. ही त्या दोन्ही मुलांची अवस्था. पण काहीही झाले तरी आम्ही शाळेत बसणारच, हा त्यांचा हट्ट. दोन-तीन वेळा शिक्षकांनी त्यांना समजावून परतही पाठविले. तरी या चिमुकल्यांनी शाळेचा लळा काही सोडला नाही. शेवटी, वय कमी असले, तरी त्यांना शाळेत घेतले.

ठळक मुद्देवय नाही, पण इच्छा आहे : पहिल्या दिवशी अर्धनागडे, दुसऱ्या दिवशी गणवेशात

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे पाण्यासारखा पैसा ओतून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी श्रीमंत मायबाप जिवाचा आटापिटा करीत आहेत. तर दुसरीकडे गरिबांच्या मुलांना इच्छा असूनही शाळेत जाण्याचा मार्ग सापडत नाही. तरीही दोन अर्धनागडी मुले थेट एका शिक्षकाच्या वर्गात येऊन धडकली अन् म्हणाली, ‘काका मला शाळेत येऊ द्या ना!’आर्थिक परिस्थिती नाही, शाळेत जाण्याचे वयही नाही.. ही त्या दोन्ही मुलांची अवस्था. पण काहीही झाले तरी आम्ही शाळेत बसणारच, हा त्यांचा हट्ट. दोन-तीन वेळा शिक्षकांनी त्यांना समजावून परतही पाठविले. तरी या चिमुकल्यांनी शाळेचा लळा काही सोडला नाही. शेवटी, वय कमी असले, तरी त्यांना शाळेत घेतले. आता ते रोज पहिल्या वर्गात बसतात, हसतात, शिकतात..! शिवम बाळू कुरुडे आणि कृष्णा दत्ता पोटे अशी या शाळाभक्त चिमुकल्यांची नावे आहेत.बालमनाची शिक्षणाची ओढ अधोरेखित करणारी ही घटना आहे पुसद तालुक्यातील मनसळ गावातली. या गावातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे राज्यात ‘ज्ञानरचनावादाचा मनसळ पॅटर्न’ रूढ करणारे केंद्र ठरली आहे. परगावातील, परजिल्ह्यातील शिक्षकांनाही या शाळेची ओढ लागली आहे. मग गावातले चिमुकलेही साहजिकच या शाळेच्या प्रेमात पडले आहेत. पण याच गावातील शिवम नावाच्या चिमुकल्याला शाळेत येण्याची संधीच मिळत नव्हती.काही दिवसांपूर्वी जूनमध्ये त्याने बाबाला घेऊन शाळा गाठली. शिक्षकांनी सांगितले, याचे वय कमी आहे, शाळेत घेता येत नाही, पुढच्या वर्षी या. वडील शिवमला परत घेऊन गेले. पण त्याची शिकण्याची आसक्ती काही त्याला स्वस्थ बसू देईना. तो काही दिवसांनी पुन्हा शाळेत आला. पण जमले नाही. पुन्हा दोन-तीनदा शाळेत आला, तरी वय कमी असल्याने त्याला शाळेत थारा मिळाला नाही. शेवटी सोमवारी तो त्याच्यासारखाच आणखी एक मित्र घेऊन आला.विजय विश्वकर्मा हे ज्येष्ठ शिक्षक सोमवारी विद्यार्थ्यांचा परिपाठ घेत होते. त्याचवेळी शिवम आणि कृष्णा हे दोघेही संपूर्ण ‘तयारीनिशी’ थेट त्यांच्या वर्गातच धडकले. शिक्षकांनी त्यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा एकच हट्ट कायम होता, ‘काका आम्ही शाळेत येतोच!’ शेवटी त्यांना शाळेत घेण्यात आले. सोमवारी ते शाळेत आले तेव्हा अंगात फक्त पँट होता. दुसºया दिवशी शिक्षक विश्वकर्मा यांनी बाजारातून त्यांच्यासाठी दोन गणवेश आणले. मुलं शाळेत आल्यावर स्वत:च त्यांना गणवेश घालून दिले. आता पाच दिवसांपासून ते रोज शाळेत येत आहेत. शिक्षणाची ही ओढ, त्यांना पुढे कुठे घेऊन जाईल हे वेगळे सांगण्याची गरज आहे का?आईबाबांना न आणता मिळविली अ‍ॅडमिशन!कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतानाही अनेक तरुणांना कुणाला तरी सोबत नेण्याची गरज भासते. पण शिवम आणि कृष्णा या पाच वर्षांच्या चिमुकल्यांनी आपल्या पहिल्या वर्गाच्या अ‍ॅडमिशनसाठी एकट्यानेच शाळा गाठली. वयात बसत नसतानाही शिक्षकांपुढे हट्ट धरून आपली अ‍ॅडमिशनही करवून घेतली. पोरांची ही आसक्ती बघता जिल्हा परिषदेने अंगणवाड्या आणि शाळा एकाच परिसरात आणि एकाच वेळेत भरविण्याची गरज आहे.बाबा गेले मजुरीला, मुले आले शाळेलाही दोन्ही मुलं मागासवर्गातील आहेत. शिवमचे आईवडील दोघेही उसतोडीच्या मजुरीसाठी परजिल्ह्यात गेले आहेत. शिवम सध्या गावात आजोबाकडे राहतो. तर कृष्णाचे वडील सायकलवर भाजीपाल्याचे टोपले बांधून परगावी विक्रीसाठी जातात. ही दोन्ही मुलं आता जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षित वातावरणात आली आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षक