शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद अंदाजपत्रकात अनाठायी खर्चाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:28 IST

नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर होऊ शकते, असाही प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देस्थायी समिती सभा : कर्ज असतानाही शिलकीचे बजेट कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर होऊ शकते, असाही प्रश्न उपस्थित केला.नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत समितीची सभा झाली. यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, नियोजन सभापती शुभांगी हातगावकर, महिला बालकल्याण सभपाती पुष्पा राऊत यांच्यासह समिती सदस्य चंद्रशेखर चौधरी, मनोज मुधोळकर, लता ठोंबरे उपस्थित होत्या.पालिकेने प्रस्तावित अर्थसंकल्प हा ५२ कोटी ५२ लाखांच्या शिलकीचा असल्याचे सभेपुढे ठेवले. यावेळी प्रत्येक घटकावर झालेला खर्च आणि त्याची प्रत्यक्ष कामाची स्थिती याचे सखोल विवेचन सदस्यांनी केले. नगरपरिषदेची विविध प्रकरणे न्यायालयात जातात, त्यावर मोठा खर्च होऊनही निकाल पालिकेच्या बाजूने लागत नाही. यावर सर्वांनीच आक्षेप घेत पॅनलवर असलेल्या वकिलांना काढून टाकण्याचे आदेश दिले. असा ठराव सर्वसाधारण सभेत वर्षभरापूर्वी झाल्यानंतरही कोणतीच कारवाई का झाली नाही, याची विचारणा प्रशासनाला करण्यात आली. इतकेच नव्हेतर कचरा कंत्राटात केवळ वकिलांच्या चुकीमुळे संपूर्ण शहराला मनस्ताप सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी नोंदविली.शहरातील लाईट व हातपंप दुरूस्ती खर्च, सार्वजनिक नळाच्या बिलापोटी पालिकेवर येणार भुर्दंड कसा थांबविता येऊ शकतो, यावर बांधकाम सभापतींनी सूचना केला. सध्या सुरू असलेल्या १७७ नळांपैकी १५० नळ त्वरित बंद करण्याचे निर्देश मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले.शिक्षण सभापती अ‍ॅड़ करूणा तेलंग यानी शैक्षणिक बजेट वाढविण्याची मागणी केली. शाळा डिजिटल करणे, शाळांची डागडुजी, प्रसाधनगृहाच्या सुविधा नसल्याचे सांगितले. शहरातील वृक्षगणनेचाही मुद्दा चर्चेला आला. एकंदरच बजेटमध्ये प्रत्यक्ष खर्च आणि झालेली कामे यावर सदस्यांनी ताशेरे ओढले. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्या. सदस्यांच्या सूचना लक्षात घेता फेरबदल करून सुधारित अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.वराह पकडण्यापेक्षा ‘पिग फार्म’ सुरू कराशहरातील मोकाट कुत्रे आणि वराह पकडण्याच्या खर्चावर सदस्य लता ठोंबरे यांनी नेमके काम कुठे केले, असा प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषदेने वराह पकडण्याऐवजी ‘पिग फार्म’ सुरू करावा, यातून नगरपरिषदेला उत्पन्न होईल आणि उरलेले अन्न, भाजीपाला या कचऱ्याची समस्या निकाली निघेल, असा उपाय चंद्रशेखर चौधरी यांनी सूचवला.नगरसेवकांच्या अभिप्रायाविना देयके नाहीनियोजन सभापती शुभांगी हातगावकर यांनी शहरातील उद्यानांची स्थिती आणि प्रत्यक्ष खर्च यावर आक्षेप घेतला. उद्याने उजाड होत असताना देयके कशी दिली जातात, याचा जाब विचारला. यावर चंद्रशेखर चौधरी यांनी स्थानिक नगरसेवकांचा अभिप्राय असल्याशिवाय कोणत्याच कामाचे देयक देऊ नये, अशी सूचना केली. याला समितीने मान्यता दिली.