शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:19 IST

जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे.

ठळक मुद्देदहा लाख महिला मतदार : मात्र मूळ यवतमाळच्या एकाही महिलेला संधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे. पण या दहा लाख महिलांमधून आजवरच्या लोकसभा निवडणुकीत दहा महिला उमेदवार पुढे येऊ शकलेल्या नाही. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले गेलेले नाही. भावना गवळी आणि सूर्यकांता पाटील ही दोन नावे महिला खासदार म्हणून सांगता येतील. मात्र, त्यांचे मूळगाव लक्षात घेतले तर जिल्ह्यातून आजवर महिला खासदार झाली नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभाजित झाले आहेत. यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर आणि हिंगोली हे ते तीन लोकसभा मतदारसंघ. त्यापैकी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींना तीन वेळा खासदारकी मिळाली. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सूर्यकांता पाटील यांना खासदारकी मिळविता आली. मात्र या दोन्ही महिला खासदारांचे मूळ यवतमाळ जिल्ह्यात नाही. भावना गवळी वाशीम जिल्ह्यात तर सूर्यकांता पाटील नांदेडच्या रहिवासी आहेत. हा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदारांमधून आजवर एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील महिलेला लोकसभेची उमेदवारीच दिलेली नाही. (शिवसेनेच्या भावना गवळी हा अपवाद असला तरी गवळी जिल्ह्याबाहेरच्या रहिवासी ठरतात.) वणीपासून आर्णीपर्यंत आणि झरीपासून उमरखेडपर्यंत विस्तारलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १० लाख २२ हजार ७६४ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातल्या दारूविक्रीपासून, अवैध वरली मटक्यासारख्या साऱ्याच प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. किंबहुना या समस्यांमुळे त्याच सर्वाधिक पीडित आहेत. दारूबंदीचा प्रश्न घेऊन हजारो महिला रस्त्यावर आवाज उठवित आहेत. पण लोकसभेच्या मैदानात त्यातून एखादीला तिकिट द्यावे, तिला संसदेत धाडण्यासाठी झटावे, अशी मानसिकता एकाही पक्षाने दाखविलेली नाही. मोजक्या पाच-सहा महिलांनी हिंमत करून अपक्ष उमेदवारी दाखल करून पाहिली. पण कोट्यवधीचे ‘बजेट’ असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांची कोणी दखलही घेतली नाही. 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी