पांढरकवडा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना केळापूर येथील बस स्थानकाजवळ शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. अवि विजय पाटील व रोशन बोधनवार दोघेही रा.पांढरकवडा असे जखमींची नावे आहे. दोघेही दुचाकीने रूढा येथून पांढरकवडाकडे येत होते. दरम्यान केळापूर येथे समोरून येणारा आयचर ट्रक एम.एच.३१-डब्ल्यू. ८७७७ याने दुचाकीला धडक दिली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना येथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले.(शहर प्रतिनिधी)
दुचाकीला ट्रकची धडक, दोन गंभीर
By admin | Updated: March 22, 2015 01:58 IST