लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : दारव्हा-यवतमाळ मार्गावरील लाडखेड फाट्याजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. निशांत नेमाडे (वय २३) आणि अनुराग भगत (२४, दोघे रा. दारव्हा) अशी मृतांची नावे आहेत. पिंकी निमकर (२२, रा. दारव्हा आणि रजत लढ्ढा (२८, रा. बोरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे चौघेही कारने (एमएच-३४-एएम-८२०१) दारव्हाकडून यवतमाळला जात होते. लाडखेड फाट्याजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती लिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात निशांत जागीच ठार झाला, तर अनुरागचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. गंभीर जखमींना येथील गिरजानंद कळंबे, पवन परमाळ, रोहित गावंडे यांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
कार अपघातात दोन ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST