लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील विनायक कोटेक्स जिनिंगजवळ दुचाकी व आॅटोरिक्षाची धडक होऊन अपघात झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण ठार झाले असून सहा प्रवासी जखमी झाले आहे.दुचाकीवरील संतोष नारायण मडावी (३८) व तुळशीराम भीमा टेकाम (४५) रा.आवळगाव हे दोघेही जागीच ठार झाले. आॅटोरिक्षामधील चालक अतुल रामदास मेश्राम (३९), मारोती शिंदे (४०), सुनील भीमा तोटे (३०), सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), सुनील बबन वखनोर (३०) सर्व रा.बोटोणी, तर शिवनाळा येथील नीळकंठ टेकाम (३०) हे जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.आवळगाव येथील मृत युवक त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.२९-के.३४२८ ने पोळ्याचे साहित्य घेऊन मारेगाववरून आवळगावकडे जात होते. त्याचवेळी बोटोणीवरून एक आॅटोरिक्षा प्रवासी घेऊन मारेगावकडे येत होता. जिनींगजवळ गाय आडवी आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात या दोन वाहनांची जबर धडक झाली.
मारेगाव येथे अपघातात दोन ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST