शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात टिप्पर-मिनीडोअरच्या धडकेत दोन ठार, पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:56 IST

भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला.

ठळक मुद्देकोसाराची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला. अपघात एवढा भीषण होता की एकाच शिर टिप्परच्या चाकाखाली चिरडल्या गेले तर दुसऱ्याचे शिर धडापासून वेगळे झाले होते. अपघातस्थळावरील दृश्य अतिशय भीषण होते.भोपीदास रामदास राठोड (३५), कैलास बद्दू राठोड (३४) दोघेही रा. मीरा (जिरा) ता.पांढरकवडा अशी मृतांची नावे आहे. तर विलास बद्दू राठोड (४०), रमेश बळीराम राठोड (४५), पवन रमेश राठोड (१८), मिनीडोअर चालक कैलास भामराज राठोड (३२), विजय सदाशिव जाधव (२५) अशी जखमींची नावे आहेत. पांढरकवडा तालुक्यातील जिरा (मीरा) येथील ही मंडळी शेळ्या विकण्यासाठी टेंभुर्डा येथील जनावरांच्या बाजारात जात होते. मिनीडोअरमध्ये ३० शेळ्या होत्या. त्यामुळे काहीजण मिनीडोअरच्या कॅबीनवर बसलेले होते. कोसारा गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने (क्र.एम.एच.३४/एबी-४६१०) मिनीडोअरला जबर धडक दिली. त्यामुळे कॅबीनवर बसून असलेले दोघेजण समोरच्या बाजूला तर दोघे मागच्या बाजूला कोसळले. समोरील बाजूला कोसळलेल्या दोघांच्याही डोक्यावरून टिप्परचे चाक गेले. त्यामुळे भोपीदास राठोडचे डोके चिरडल्या गेले. तर कैलासचे शिर धडापासून वेगळे झाले. या अपघाताची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उमरी येथील रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळावर भीषण दृश्य पाहून अनेकांना भोवळ आली. रक्तमांसाचा सडा आणि धडापासून वेगळे झालेले शिर पाहून प्रत्येकजण हळहळत होता. भोपीदासच्या मागे पत्नी, दोन मुले तर कैलासच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहे. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात