शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वणी-यवतमाळ मार्गावर अपघातात दोन ठार, सात गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 13:44 IST

मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.

वणी (यवतमाळ) : मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात वणी-यवतमाळ मार्गावरील बोटोणी गावाजवळ शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडला.जितेंद्र रामदयाल सिडाणा (40) आणि किरणताई मोहन सिडाणा (37) रा. मारेगाव अशी मृतांची नावे आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा (45), दिव्या जितेंद्र सिडाणा (37), नितू श्रीराम सिडाणा (42), इंदर दीपक चन्ना (28), रश्मी इंदर चन्ना (25), कान्हा श्रीराम सिडाणा (5), लाडो जितेंद्र सिडाणा (9) सर्व रा. मारेगाव अशी जखमींची नावे आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मारेगाव येथील सिडाणा परिवार करंजी येथील मुलीकडे माता का जगराता कार्यक्रमासाठी शनिवारी दोन कारने जात होते. त्यावेळी वणी- यवतमाळ मार्गावरील बोटोणी ते जळका दरम्यान समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने एका कारला धडक दिली. त्याच वेळी पाठीमागे असलेली दुसरी कारही या अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात पहिल्या कारमधील जितेंद्र आणि किरणताई ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताने मारेगाववर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात