लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरी इजाराजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.रमेश मारोती दातारकर (४०) रा. दहेगाव असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. मनोज बबन चाफले रा. बमर्डा ता. हिंगणघाट जि. वर्धा हे दुचाकीने (क्र.एम.एच.३२-एच-७०५९) वडकीकडे जात होते. दुसरी दुचाकी (क्र.एम.एच-२९-एपी-१४१५) विरुद्ध दिशेने वडकीकडून दहेगावकडे जात होती. या दुचाकींची बोरी (ईचोड) जवळ समोरासमोर धडक झाली. यात रमेश दातारकर जागीच ठार झाले. गजानन दातारकर (३५) आणि सारंग खंडाळकर (२९) दोघे रा. दहेगाव हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना करंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. दरम्यान वृत्तलिहिस्तोवर वडकी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:55 IST
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरी इजाराजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार
ठळक मुद्देतीन जण जखमी : राष्ट्रीय महामार्गावरील घटना