शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:29 IST

शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले.

यवतमाळ: महागाव तालुक्यातील कोठारी  शिवारातील विहिरीमध्ये पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली. 

कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी  अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत खाट सोडून दोन्ही अस्वलांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.येवतीकर व डॉ.वाय.एस. पाटील यांना पाचारण करून अस्वलांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आला.

दोन्ही अस्वलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला. सदर विहीर जमीन लेव्हलला आहे. तसेच सभोवताल गवत वाढले आहे. त्यामुळे दोन्ही अस्वल विहिरीत पडल्याचा कयास वर्तविला जात आहे. उत्तरिय तपासणीनंतर दोन्ही अस्वलांचे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांसमक्ष दहन करण्यात आले.

घटनास्थळी कोणत्याही प्रकारे वीज प्रवाह किंवा विषाचा प्रयोग झाल्याचे आढळले नाही. मात्र खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, यवतमाळ येथील मानव वन्यजीव कोबरा अ‍ॅडव्हेंचरची चमूसुद्धा आली होती. वन विभागाचे बी. ए. खान, क्षेत्र सहायक एस.एम. हक, एस.एम. राठोड, डी.व्ही. गावंडे, वनपाल व इतर वनकर्मचाºयांसह नागरिकांनी अस्वलांचे मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. घटनास्थळाला उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी भेट दिली.

टॅग्स :YavatmalयवतमाळDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र