शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन फौजदारांचा हृदयाघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:35 IST

वणी व लोहारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयाघाताने मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता व त्यातून वाढणाºया कामाच्या ताणातूनच अशा घटना घडत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/वणी : वणी व लोहारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा हृदयाघाताने मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मनुष्यबळाची प्रचंड कमतरता व त्यातून वाढणाºया कामाच्या ताणातूनच अशा घटना घडत असल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे.वणीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक फौजदार म्हणून कार्यरत शैलेंद्र चौधरी (४५) यांचा सोमवारी दुपारी ३ वाजता कार्यालयातून मेघदूत कॉलनीतील घरी गेले असता अवघ्या अर्धा तासातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही कळायच्या आतच हृदयाघाताने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.कर्तव्यावरच हृदयविकाराचा झटकायवतमाळ येथील लोहारा पोलीस ठाण्यात रविवारी रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार कैलास तुळशीराम सुरपाम (५७) यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाली. सहकाºयाने शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे यवतमाळ पोलीस मुख्यालयात सुरपाम यांना मानवंदना देण्यात आली. सोनखास येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाPoliceपोलिस