शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

बारावीत पीपल्स ज्युनिअरची तेजस्विनी कोकाटे अव्वल

By admin | Updated: May 31, 2017 00:23 IST

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गेल्या दहा वर्षांची परंपरा कायम

मुलीच अव्वल : जिल्ह्याचा निकाल ८४.८० टक्के, सर्वाधिक दिग्रस, सर्वात कमी कळंब लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गेल्या दहा वर्षांची परंपरा कायम राखत मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ८८.५५ टक्के विद्यार्थिनींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर ८१.६३ विद्यार्थी बारावी सर करू शकले. मात्र एकंदर जिल्ह्याची टक्केवारी विद्यापीठातून ढांग असून जिल्ह्याचा सरासरी निकाल ८४.८० टक्के लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून वाघापूर येथील पीपल्स कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तेजस्वीनी प्रशांत कोकाटे ही अव्वल ठरली आहे. तिला ९६.७६ टक्के (६५० पैकी ६२९) गुण मिळाले. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ३३ हजार ४६१ विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेचा अर्ज भरला होता. परंतु, त्यापैकी ३३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात १८ हजार १०८ विद्यार्थी तर १५ हजार ३०७ विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी एकूण २८ हजार ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७८२ असून विद्यार्थिनींची संख्या १३ हजार ५५४ इतकी आहे. विशेष म्हणजे, परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असूनही त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षाही अधिक आहे. शंभर नंबरी यश बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावलेली असतानाच तब्बल १५ विद्यालय-महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची उंची गाठली आहे. या १५ महाविद्यालयांनी तिन्ही विज्ञान, कला, वाणिज्य अशा तिन्ही शाखांमध्ये १०० टक्के यश मिळविले आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनी तीनपैकी एखाद्या शाखेचा निकाल १०० टक्के घेतला आहे. जवाहरलाल दर्डा कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, नंदूरकर कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय रूईवाई, साईबाबा विद्यालय टेंभी, दिनबाई महाविद्यालय दिग्रस, मोहनाबाई हायस्कूल दिग्रस, दामोदर पाटील महाविद्यालय दिग्रस, शिवाजी विद्यालय भोजला, तेजमल गांधी महाविद्यालय ब्राह्मणगाव, हनिफ मास्टर उर्दू हायस्कूल, संत तुकाराम महाराज कनिष्ठ महाविद्यालय राणी अमरावती, विराणी महाविद्यालय यवतमाळ, विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव, एसपीएम विद्यालय घाटंजी, समर्थ विद्यालय घाटंजी या शाळा-महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तेजस्विनी म्हणते, अभियंता होणार तेजस्विनीने हे यश मिळविण्यासाठी दररोज सात ते आठ तास अभ्यास केला. तेजस्विनी म्हणाली, मला अभियंता व्हायचे आहे. त्या दृष्टीने भविष्यात वाटचाल करणार आहे. ती आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालय आणि सी-इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांना देते.