शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागावर तिबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:25 IST

१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली.

ठळक मुद्देखंडित पावसाचा परिणाम : हवामान खात्याचे अंदाज खोटे, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली. अद्याप जोरदार पाऊस येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने या शेतकºयांना आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मृग नक्षत्रावर पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यातच मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामान खात्यावरील विश्वास दुनावला. त्यामुळे उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी ८ ते १० जून या दरम्यान शेतात कपाशी, तूर व सोयाबीनची लागवड केली. वातावरण पावसाळीच असल्याने ११ जूननंतरही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली. मात्र इथेच घात झाला. १० जूननंतर पावसाने चांगलीच दडी मारली. या भागात गेल्या १५ दिवसांपासून अद्याप सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस, तर काही भागात पावसाची दडी, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ७ ते १० जूनपर्यंत पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके अद्यापही तग धरून आहेत. जमिनीत काहीसा ओलावा असल्याने ही पिके वाढत आहे. मात्र ११ जूननंतर पेरण्या झालेली पिके उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्याहीउपरांत जोमदार पाऊस न झाल्याने आता ही दुबार पेरणीही धोक्यात आली असून तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आजपर्यंत वणी तालुक्यात केवळ १८६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावखंडित पावसामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लष्करी अळीच प्रादूर्भाव दिसून आला. जवळपास प्रत्येकच शेतांमध्ये देवगायींचा (तेलण्या) प्रकोप वाढला असून य देवगायी तूरी व कपाशीची पाने कुरतडून खात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये थिमेटचा वापर करीत आहे. मात्र तरीही तेलण्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी