शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:48 IST

एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची सत्तासंपादन महासभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.येथील समता मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सत्ता संपादन महासभा बुधवारी सायंकाळी झाली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसवर सडकून टिका केली. राज्यातील एससी, एसटी व ओबीसी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं बजेट हे केवळ ५०० कोटी इतकच आहे. मात्र सरकारची दानत नाही. या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न हे सरकार करतंय. शिक्षण सर्वांना आणि शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. आज मेडिकल व अभियांत्रिकीच्या ओबीसींच्या १५ टक्के जागा केवळ ऐपत नसल्यामुळे रिक्त राहतात. हे महागड शिक्षण सर्वसामान्यांच्या ऐपतीत आलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.सभेला एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दूद्दीन ओवैसी येणार होते. मात्र त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. तसेच एमआयएमचे आमदारही सभेला उपस्थित नव्हते. एमआयएमच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.८५० कोटी घोषणा म्हणजे फसवणूकआता निवडणुका डोळ्यापुढे पाहून भाजपा ओबीसींच्या हिताची भाषा बोलतंय ही भूमिका त्यांनी यापूर्वी का घेतली नाही, याचा खुलासा करावा. लोकसभेतील आरक्षणाच्या जागा सोडून इतर मतदारसंघातून ओबीसीतील अलुतेदार, बलुतेदारांना संधी का दिली नाही. आज राज्य सरकारने ओबीसीसाठी ८५० कोटींच्या आर्थिक तरतूदीची घोषणा केली. मात्र ही चक्क फसवणूक आहे. आधी हे बिल विधानसभेत मंजूर करावं लागतं. त्याशिवाय सर्वसामान्यांना लाभ मिळणार नाही. खऱ्याअर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची गरज आहे. राज्यातील केवळ १६९ कुटुंबांकडेच आलटून पालटून सत्ता राहिली आहे. सत्तेला घातलेले बांध फोडल्याशिवाय तिचं सामाजिकरण होणार नाही. यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर