शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर विश्वास ठेवा, प्रत्येकाला न्याय मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:28 IST

आपल्या हद्दीतील पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देनुरूल हसन : वणी पोलीस ठाण्याला अप्पर अधीक्षकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठीच आपण या पदावर रूजू झालो. प्रत्येकाला न्याय मिळेल, फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा. आपल्या हद्दीतील पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी मंगळवारी येथे केले. वणी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.आगामी पोळा, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्रोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला आपल्या सहकार्याची साथ असावी, असेही ते यावेळी म्हणाले. येथील पोलीस वसाहत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी दिली. तसेच येथील वाहतूक शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता, शहरातील अत्यंत संवेदनशील चौकात असणाऱ्या चौक्या व बिट पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात असून चौकाचौकांत ठिय्या मांडून बसत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. यावर नुरूल हसन यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न हा जिल्ह्यातच असून याबाबत त्या-त्या ठिकाणातील न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवू, त्यांनी लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.वणी वाहतूक उपशाखेकरिता २० होमगार्ड व पोलीस ठाण्याकरिता २० होमगार्ड, असे एकूण ४० होमगार्ड लवकरच स्थायी स्वरूपात नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस