शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

पीयूसीचे तिप्पट दर, ना रेटबोर्ड, ना शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 5:00 AM

दिवसेंदिवस सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत आहे. अवेळी पाऊस, क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा आणि हिवाळा, असे ऋतुचक्र प्रभावित होत आहे. या प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांसाठी पीयूसी सक्तीची केली.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रणास नागरिकांचा प्रतिसाद : मात्र वाहनधारकांची खुलेआम लूट, आरटीओला जुमानत नाहीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवसेंदिवस सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत आहे. अवेळी पाऊस, क्षमतेपेक्षा जास्त उन्हाळा आणि हिवाळा, असे ऋतुचक्र प्रभावित होत आहे. या प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांसाठी पीयूसी सक्तीची केली. यामुळे वाहन चालकही प्रदूषनाला नियंत्रित करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र या संधीचा लाभ घेत पीयूसी सेंटर चालकांनी वाहनधारकांची लूट सुरू केली आहे. निर्धारित दरापेक्षा तिप्पट दर आकारून वाहनांची पीयूसी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यवतमाळ शहरातील काही पीयूसी संटरला भेट दिली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले.उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर पीयूसी सेंटरच्या नावाखाली १० ते १२ दुकाने थाटली गेली. दररोज तेथे अनेक वाहन चालक पीयूसी काढण्यासाठी येतात. त्याकरिता या केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागतात. दररोज प्रचंड गर्दी होते. ज्या वाहन चालकांना पीयूसी काढायची असते, त्यांना आपण कुठे जाव, असा प्रश्न पडतो. पीयूसी केंद्राबाहेर कुठलेही रेटबोर्ड लावलेले नाही. एक लॅपटॉप आणि पीयूसी काढणारे यंत्र, त्याचे आरपीएम मोजणारे मशीन, अशी उपकरणे तेथे ठेवलेली असते. पीयूसी काढण्यासाठी शास्त्रीय दृष्टीने प्रक्रिया राबविली जाते. यात परवान्यासाठी आलेले वाहन प्रदूषण पसरवत आहे की नाही, याची प्रथम तपासणी केली जाते. वाहन योग्य असेल, तरच पीयूसी काढली जाते.ही साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी शासकीय दरही ठरलेले असतात. दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने, पेट्रोलवर धावणारी आणि डिझलवर धावणारी वाहने, असे वाहनांचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार त्याचे दर आकारले जाणे आवश्यक आहे. मात्र केंद्रावर असे कुठलेच दर फलकक लावले गेले नाही. या ठिकाणी कुणीही शासकीय दर सांगण्यास तयार नसते. आरटीओ कार्यालयात ज्या संबंधितांकडे हा टेबल आहे, त्यांनाही पीयूसीचे दर माहिती नसल्याची धक्कादायक बाब मंगळवारी पुढे आली.या विभागात त्याची विचारणा केली, तर खालच्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे टेबल असल्याचे सांगितले. संबधित कर्मचाºयांना विचारणा केली, तर त्या कर्मचाºयाने उलट टपाली विचारणा करत पीयूसी रेट विचारणाºयांनाच प्रश्न केला. तुम्हाला त्या केंद्रावर जे दर सांगितले आहेत, तेच दर आहे, असे म्हणत त्यांनी टोलवून लावले. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर पीयूसीसाठी जत्रा भरलेली असते. वाहनांची आणि दुकानांची तेथे दाटीवाटी आहे. त्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते, एवढी चिक्कार गर्दी आहे.प्रत्येक पीयूसी केंद्राबाहेर कुठलेही रेट बोर्ड नाही. त्यांना विचारणा केली तर दुचाकीला १०० ते ११० रूपये आणि चार चाकीला २०० ते २२० रूपयांचा दर सांगितला जातो. ही प्रक्रिया तत्काळ पार पाडणारी आहे. यामुळे ग्राहक कुठलाही विचार न करता पैसे देऊन मोकळे होतात. पीयूसी दराची विचारणा केली, तर तुम्ही कुठेही विचारा हाच ‘रेट’ आहे असे सांगितले जाते. खºया दर पत्रकापासून वाहनधारकांना अनभिज्ञ ठेवले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी संपर्क केला, तर आणखी धक्कादायक माहिती दिली.अधिक आरपीएम, मानवासाठी अपायकारकवाहनांना नियंत्रित करण्यासाठी पीयूसीची तपासणी असते. यात २८०० आरपीएमच्यावर जर वाहनांची नोंद झाली, तर अशा वाहनांना पुन्हा फेरतपासणीसाठी आणावे लागते. यात प्रदूषण पसरविणारे घटक कमी करण्यासाठी पुन्हा गॅरेज अथवा इतर ठिकाणी वाहन न्यावे लागते. नंतर पीयूसीची तपासणी करणे बंधनकारक आहे. अनेकदा वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर फेकला जातो. हा धूर मानवी आरोग्याला घातक असतो. अशा वाहनांना रस्त्यावर धावण्यापासून मज्जाव केला जातो. त्याच्या दुरूस्तीनंतरच अशा वाहनांना नव्याने धावण्यासाठी परवानगी दिली जाते.असे आहेत शासकीय दर१. दुचाकीचे शासकीय दर ३५ रुपये आहे. मात्र केंद्रावर प्रत्यक्षात १०० ते १२० रूपये उकळले जातात. चारचाकी वाहनाचे शासकीय दरही वेगळे आहे. पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवरील चारचाकी वाहनांना ९० रूपये शासकीय दर आहे. डिझेलवर चालणाºया वाहनांसाठी ११० रूपये शासकीय दर आहे. प्रत्यक्षात केंद्रावर २०० ते २५० रूपये दर आकारला जातो. ट्रक चालकांना ४०० रूपये आकारले जातात. पेट्रोलवरील तीन चाकी वाहनांसाठी शासकीय दर ७० रूपये आहे. प्रत्यक्षात केंद्रावर जादा पैसे उकळले जातात.पीयूसीचे जिल्ह्यात ५५ केंद्रवाहनांची पीयूसी काढण्यासाठी यवतमाळात १० ते १२ केंद्र आहेत. उर्वरित ३८ केंद्र जिल्ह्यातील विविध भागात आहे. यवतमाळातील पीयूसी केंद्रांची ही अवस्था असेल, तर जिल्ह्यातील इतर केंद्रांची काय अवस्था असेल, हे सांगणे अवघड आहे.अतिरिक्त दर आकारणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणात स्वत: लक्ष घालणार आहे. यात तक्रार दाखल करताच केंद्रांवर कारवाई होईल. एका सेंटरला बुधवारी नोटीस बजावली.- राजेंद्र वाढोकरउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ