शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

वृक्ष लागवड मोहिमेत पारंपरिक वृक्ष वनविभागाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:45 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.

ठळक मुद्देविदेशी झाडांना स्थान । स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीबाबत अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.वणी, पांढरकवडा व झरी या तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये कडूनिंब, साग, बांबू या वृक्षांची रोपसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी जांभूळ, खैर, आवळा, बोर, आजण, चिंच या वृक्षांची रोपेदेखील आढळून आली. मात्र यात जास्त प्रमाणात कडूनिंबाच्या रोपांची लागवड होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. तथापि त्या दिशेने अद्यापही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात बेहाडा या वृक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. पण त्यासाठी ती रोपे उपलब्ध नाही. बेल, कदंब, रिठा, बिबा, शेवगा या जातीच्या वृक्षांना अतिशय कमी पाणी लागते. पण त्याचीही रोपे उपलब्ध नाही. वनविभागात ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चांगली माहिती असली तरी उच्चपदस्थ अधिकाºयांमध्ये मात्र याबाबत अनास्था आहे.यालट सुईबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर या विदेशी झाडांच्या लागवडीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पाखरे बसत नाही. या झाडांची पाणी शोषण्याची क्षमताही अधिक आहे. असे असतानाही लागवडीसाठी याच वृक्षांना प्राधान्य दिले जात आहे. गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली तरी त्या फुलांना सुगंध नाही. निलगीरीचे झाड आॅस्ट्रेलियातून १९५२ साली आयात केलेल्या गव्हासोबत आले आहे. हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामी जलस्त्रोत सुष्क होतो.लागवडीनंतरही वृक्षांचे अस्तित्व नाहीवृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. पिंपळ, कडूनिंब, चिंच, आवळा, बोर या वृक्षांचीही लागवड दरवर्षी करण्यात येते. परंतु चार वर्षानंतरही टिपेश्वर अभयारण्यात या झाडांचे अस्तित्व दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग