लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच वरळी मटका सुरू ठेवण्यासाठी लाच मागितली. या प्रकरणात येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये गुरुवारी अडकला.कैलास केशव लोथे असे या आरोपी हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. गावात वरळी मटक्याच्या धंदा सुरू करण्यासाठी या कर्मचाऱ्याने तत्कालीन ठाणेदारासाठी म्हणून लाच मागितली होती. लोथे ३० हजार रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रार वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात २१ जानेवारीला करण्यात आली होती.त्यावरून २१ आणि २२ जानेवारीला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अखेर गुरुवारी कैलास लोथे याच्याविरुद्ध दारव्हा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एन.बी. बोºहाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन टवलारकर, पोलीस नाईक अरविंद राठोड, सुनील मुंदे यांनी केली.
दारव्हाच्या पोलीस कर्मचाऱ्यावर ‘ट्रॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:39 IST
अवैध धंद्यांना पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच वरळी मटका सुरू ठेवण्यासाठी लाच मागितली. या प्रकरणात येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये गुरुवारी अडकला.
दारव्हाच्या पोलीस कर्मचाऱ्यावर ‘ट्रॅप’
ठळक मुद्देलाच मागितली : अवैध धंद्यांवर मेहेरबान