शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:32 IST

पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती.

ठळक मुद्देनिराधार महिला : मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती. ही बाब वाहतूक पोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.लोहारा येथील लता भिसे ही महिला पतीच्या निधनानंतर खंबीरपणे आपल्या मुलांना शिकविण्यासाठी धडपडत आहे. महागाईच्या काळात दिवसरात्र राबून पोटापुरतेही शिल्लक पडत नाही. त्यात मुलगी प्रीती बारावीला तर, मुलगा प्रेम दहाविला आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च लताबाईला झेपत नव्हता. तरी कष्ट सुरूच होते. हातगाडीवरून नारळपाणी विक्रीचा व्यवसाय ती करते. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांना तिच्या संघर्षाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ समाजसेवक योगेश पाटील आणि बालाजी ठाकरे यांच्या सहकार्याने या कुटुंबाला मदतीचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्याचा संकल्प केला. वाहतूक शाखा कार्यालयात या मुलांना गणवेश व शालेय साहित्य देण्यात आले. ट्युशन फिसह सर्वच खर्च देण्याचा संकल्प केला. यावेळी वाहतूक शाखेतील प्रदीप तांबेकर, सुरेंद्र वासनिक, यशपाल बैस, सुरेश मोहोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस