लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याप्रकरणी रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविला आहे. जीवघेणा हल्ल्याच्या प्रयत्नासह विविध गुन्हे चालक राजू गरड याच्याविरूद्ध नोंदविले आहे.नांदेसावंगी येथे अवैध रेती उपसा करणाºयांविरूद्ध उपविभागीय अधिकारी संतोष तांगडे, तहसीलदार अनिल देऊळगावकर आदींच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली. तीन ट्रॅक्टर व एक टिप्पर कारवाईत अडकले. यातील एका ट्रॅक्टरचा चालक राजू गरड याने रेती रिकामी करून महसूल कर्मचाºयांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.लिलाव न झालेल्या नांदेसावंगी रेती घाटावर वाहनांमध्ये रेती भरली जात होती. त्यातील एक ट्रक व दोन ट्रॅक्टर बाभूळगाव तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली. ही वाहने बबलू ठेकेदार, गोलू राठी, सुधीर काळे यांची असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख हे करीत आहे. धाड टाकणाºया पथकात मंडळ अधिकारी संतोष भागवत, तलाठी थोरात, पाचारे, गजघाटे, चौधरी, गायकवाड, चव्हाण, नांदेकर, डोळसकर आदींचा समावेश होता.
महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर घातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:56 IST
महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याप्रकरणी रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविला आहे. जीवघेणा हल्ल्याच्या प्रयत्नासह विविध गुन्हे चालक राजू गरड याच्याविरूद्ध नोंदविले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर घातला
ठळक मुद्देरेती तस्कर : जीवघेणा हल्ल्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल