शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आज बहुजन वंचित आघाडीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:37 IST

सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे.

ठळक मुद्देबालमुकुंद भिरड : प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसींची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे. यवतमाळातही बुधवारी दुपारी ३ वाजता वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होत आहे, अशी माहिती आघाडीचे निरीक्षक बालमुकुंद भिरड यांनी पत्रपरिषदेत दिली.वंचित बहुजन आघाडीच्या सभेला पंढरपुरातून सुरुवात झाली. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि आता यवतमाळमध्ये समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे ही सभा होत आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी, आमदार इम्तियाज जलील, आमदार अ‍ॅड.वारीस पठाण, डॉ.डी.एम. भांडे, हिरासिंग राठोड, लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार विजय मोरे संबोधित करणार आहे. जिल्ह्यासह परिसरातूनही मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीतील घटक सभेला उपस्थित राहणार आहे. बारा बलुतेदार आणि समाजातील बहुसंख्य घटक यांना संधी देण्यासाठी हा लढा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्य व देशाच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे, असे बालमुकुंद भिरड यांनी सांगितले.पत्रपरिषदेला भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, शहर अध्यक्ष दिनेश करमनकर, नंदकिशोर निलखन, राजेंद्र तलवारे, अशोक शेंडे, विशाल पोले, प्रमोद पाटील, धनंजय गायकवाड, गुणवंत मानकर, निरंजन खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी