शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हुर्रे! पर्यटकांसाठी टिपेश्वर अभयारण्याचे दार उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:17 IST

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायवाटा पुसल्या जातात, तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. मात्र, आता पर्यटकांसाठी टिपेश्वर अभयारण्याची दारे उघडली आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, हे अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी फुलले असून येथील व्याघ्र दर्शन हे त्यांचे मुख्य आकर्षण आहे. या अभयारण्यात वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी वाढल्याने पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता, पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे.

हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये हे अभयारण्य व्यापलेले आहे. उंच डोंगराळ व दऱ्या-खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात. तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. टिपेश्वर अभयारण्यात सफर करण्याकरिता पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग करता येईल. 

टॅग्स :SocialसामाजिकTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यtourismपर्यटन