शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 08:41 IST

13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी टी 1 या वाघिणीला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास गोळी घालून ठार केले, ही घटना बोराटी वन परिसर कंपार्टमेंट 149 मध्ये घडली आहे.

यवतमाळ : 13 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी टी 1 या वाघिणीला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास गोळी घालून ठार केले, ही घटना बोराटी वन परिसर कंपार्टमेंट 149 मध्ये घडली आहे. वारंवार चकवा देणाऱ्या टी 1 वाघिणीला ठार करण्यास शेवटी वनविभागाला यश आले. मोठ मोठाले असलेले दाट गवत आणि झाडे यामुळे वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे अवघड होत होते. वारंवार प्रयत्न करून वेग वेगळे प्रयोग करून सुद्धा वनविभाग टी 1 वाघिणीला पकडण्यास अयशस्वी झाले होते. त्यामुळे सर्वच स्तरावरून वनविभागाला रोष सहन करावा लागत होता.  24 तास 200 कर्मचारी वाघिणीला पकडण्यासाठी दिवसरात्र एक करत होते. परंतु घनदाट जंगलाचा उपयोग करून वाघीण प्रत्येक वेळेस परिसर बदलत होती. दोन दिवसाअगोदर महाराजा बाग नागपूर येथील वाघिणीचे मूत्र जंगल भागात शिंपडले होते, त्या वासाने वाघीण वन पथकाच्या समोर आली होती, याच संधीचा उपयोग करून वनविभागाने बोराटी या भागात अमेरिकन पर्फ्युम आणि दुसऱ्या वाघिणीचे मूत्र शिंपडले, त्याच वासामागे वाघीण बोराटी येथील वाघडोट्टा या पुलाजवळ आली.प्रथम तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दाट झाडी-झुडुपांमुळे ते अयशस्वी ठरले आणि वाघिणीला त्यानंतर गोळी घालून ठार करण्यात आले, ही माहीत इतकी गुप्त ठेवण्यात आली की अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणाला ही घटनास्थळी जाण्यास मनाई होती. त्या नंतर पंचनामा करून वाघिणीचा मृतदेह नागपूर येथे नेण्याचे सांगण्यात आले. सदर रात्र असल्यामुळे पहाटे 4:30 पर्यंत हा पंचनामा सुरू होता.

टॅग्स :Tigerवाघ