लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. त्यांच्या विरोधाची दखल घेत अखेर केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तथा वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी नवाबला यवतमाळ जिल्ह्यातील जंगलातून परत पाठविले.वाघाला ठार करू नये, बेशुद्ध करून इतरत्र सोडावे, त्या कामी नवाबची नेमणूक करू नये, अशी वन्यजीव प्रेमींची मागणी होती. त्यासाठी त्यांनी यवतमाळपासून नागपूरपर्यंत आंदोलने केली. अखेर या प्रकरणात मनेका गांधी यांनी हस्तक्षेप करून नागपूर वन मुख्यालयाला सूचना दिल्या. त्यानंतर नवाबला परत जाण्यास सांगण्यात आले. या वाघिणीचा कळंब, पांढरकवडा, राळेगाव तालुक्यात धुमाकूळ आहे.
वाघाचा शूटर नवाब जंगलाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:22 IST
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता.
वाघाचा शूटर नवाब जंगलाबाहेर
ठळक मुद्देमनेका गांधींची मध्यस्थी : वन्यजीव प्रेमींच्या आंदोलनाची दखल