शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

नगरपरिषद विस्ताराच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: December 25, 2014 23:38 IST

नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा

नागरिकरणाचा वाढतोय दाब : दहा ग्रामपंचायतींच्या विलीनीकरणाने मिळणार वाट सुरेंद्र राऊत - यवतमाळ नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार करणे हाच एकमेव उपाय पुढे आला आहे. शहराच्या लोकसंख्येइतकीच संख्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे यवतमाळ नगरपरिषद ही विस्तारच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार यवतमाळ शहराच्या लोकसंख्येत चार हजाराने घट झाली. शहराची लोकसंख्या एक लाख २० हजार इतकी होती. आता ती १ लाख १६ हजार इतकी झाली आहे. त्यात नुकत्याच समाविष्ठ झालेल्या यवतमाळ ग्रामीण क्षेत्राच्या १४ हजार ७८० लोकसंख्येची आणखी भर पडली आहे. प्रत्यक्षात इतकीच लोकसंख्या लगतच्या दहा ग्रामपंचायतींची आहे. येथे एक लाख २३ हजार ६११ जणांचे वास्तव्य आहे. विशेष असे, हे सर्व नागरिक दिवसभर नगरपरिषद क्षेत्रातच राहतात. केवळ त्यांचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने एक लाख ३० हजार लोकसंख्या गृहीत धरून केलेले नियोजन कोलमडते. शहरातील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वाढलेली गर्दी याचा पुरावा आहे. नियोजन एक लाख ३० हजाराचे आणि प्रत्यक्ष वापर करणारे दोन लाख ५४ हजार ३९१ नागरिक असा, असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच नागरी सुविधांचा बोजवारा उडतो आहे. नगरपरिषद क्षेत्रातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने लोकसंख्येत घट दिसत असलीतरी प्रत्यक्ष येथील साधनांचा वापर करणारी लोकसंख्या दुपट आहे. याचा ताळमेळ बसविण्यासाठी नगरपरिषदेचा विस्तार करणे हाच एकमेव पर्याय पुढे आला आहे. यातून नगरपरिषदेच्या उत्पन्नातही दुपटीने वाढ होणार आहे. शहरात सुमारे ३१ हजार मालमत्ता असून तेवढीच वाढ विस्तारानंतर अपेक्षित आहे. सध्या पाच कोटींच्या घरात वसूल होणार कर विस्तारानंतर दहा कोटींवर पोहोचणार आहे. शिवाय नगरविकास विभागाच्या नियमाप्रमाणे नगरपरिषद क्षेत्रात पाच किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या ग्रामपंचायतींचे विलिनीकरण करणे आवश्यक आहे. येथे सर्वच ग्रामपंचायत पाची किलोमीटर तर सोडाच थेट नगरपरिषद क्षेत्रातच मिसळलेल्या आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची हद्द कोणती आणि नगर परिषदेची कोणती हेच लक्षात येत नाही. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडते. या समस्येवर हद्द वाढ हेच औषध असून त्यावर शुक्रवार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.