शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीत तीन युवक बुडाले; युद्धपातळीवर शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 21:18 IST

महाशिवरात्रीच्या यात्रेवरून परत येताना घडली दुर्घटना.

संतोष कुंडकर, वणी (यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील  भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रा करून परत येत असलेले तीन युवक वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीत बुडाले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे तिघेही वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील  रहिवासी आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. 

संकेत पुंडलिक नगराळे (२७), अनिरूद्ध चाफले (२२) व हर्ष चाफले (१६) अशी नदीपात्रात बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच, वणी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. माजरी (जि.चंद्रपूर) येथील पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या तरूणांचा शोध सुरू होता. मात्र वृत्त लिहिस्तोवर बुडालेल्या तरूणांचा शोध लागला नव्हता.  संकेत नगराळे, अनिरूद्ध चाफले व हर्ष चाफले हे तिघेजण काही मित्रांसमवेत शुक्रवारी सकाळी भटाळी येथील महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी परत येताना वणीपासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या पाटाळा येथील वर्धा नदीवर आंघोळीसाठी थांबले. नदीपात्रात उतरल्यानंतर एका पाठोपाठ तिघेही नदीच्या खोल डोहात बुडाले. सोबतच्या मित्रांनी या घटनेबाबत घरच्यांना व नंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बुडालेल्या तरूणांचे नातलग व मित्र घटनास्थळी पोहचले.

माहिती मिळताच, वणीचे ठाणेदार अनिल बेहरानी, तहसीलदार निखील धुळधर  हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या तीन तरूणांचा माजरी पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र तरूणांचा शोध लागला नाही. शोध घेण्यासाठी यवतमाळ येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार निखील धुळधर यांनी दिली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ