शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात राज्यातील चार कोटींची वीज चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:32 IST

गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली.

ठळक मुद्दे४१ लाखांचे बक्षीस महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. यात माहिती देणाऱ्यांना ४१ लाखांचे बक्षीस देण्यात आले.वीज गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणतर्फे कसोशीने प्रयत्न सुरू आहे. वीज चोरीविरुद्ध वारंवार मोहीम राबविली जात आहे. मात्र वीज चोरटे नवीन युक्त्या वापरून वीज चोरी करीतच आहे. ही वीज चोरी उघडकीस आणणे महावितरणच्या अवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे महावितरणने अशा वीज चोरीची माहिती दिल्यास संबंधितांना वीज चोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती. त्यावरून राज्याच्या विविध भागात महावितरणच्या भरारी पथकाने धाडी टाकून गेल्या तीन वर्षात चार कोटी १० लाखांची वीज चोरी उघडकीस आणली.२०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात मिळालेल्या माहितीवरून महावितरणच्या भरारी पथकांनी राज्यातील ३६ ठिकाणी धाडी टाकल्या. त्यातून चार कोटी १० लाखांची वीज चोरी उघडकीस आली. संबंधितांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. या रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणून वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाख रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या या सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.गळती, चोरी सुरूचमहावितरणतर्फे गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक भागात अद्यापही वीज गळती आणि चोरीचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे महावितरणने आता जादा गळती आणि चोरी असलेल्या भागात एरिअल बंच केबल टाकण्याचा निर्णयही घेतला आहे. अमरावतीसह काही ठिकाणी अशी केबल टाकण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी वीज चोरी असलेल्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी देण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा