शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जिल्ह्यात खतासाठी तीन रॅक पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार करावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका व परिसराकरिता लगतच्या नांदेड जिल्ह्यात रॅक पॉईंट द्यावा,.....

ठळक मुद्देचंद्रपूर, नांदेडचा पर्याय : पालकमंत्र्यांचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर होतो. मात्र १६ तालुक्याच्या जिल्ह्यासाठी धामणगाव(रेल्वे) येथे एकमेव रॅक पॉईंट आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. ही अडचण ओळखून पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत जिल्ह्याला चंद्रपूर व नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर रॅक पॉईंट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला मान्यता मिळाली आहे.जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार करावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका व परिसराकरिता लगतच्या नांदेड जिल्ह्यात रॅक पॉईंट द्यावा, तर वणी परिसरासाठी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात रॅक पॉईंट तयार करावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे प्रत्येक तालुक्यात वेळेत खत पोहोचविणे शक्य होणार आहे. शिवाय एकट्या रॅक पॉईंटवरून पुरवठा होत असल्याने बरेचदा ऐन हंगामात खताची टंचाई निर्माण होते. पिकांना वेळेवर खत न मिळाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. ही अनेक वर्षांपासूनची समस्या पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीत मांडून दोन नवीन रॅक पॉईंट उपलब्ध करून दिले आहे.जिल्ह्याला २०२०-२१ या खरीप हंगामासाठी एक लाख ६६ हजार ४६९ मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीद्वारे सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सीईओ जलज शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळा पाटील कामारकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीSanjay Rathodसंजय राठोड