शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

करळगाव घाटात तीन बसेस फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:48 IST

एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : उन्हाळ्यातील तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. पिंपळगाव बायपासजवळसुद्धा एक बस फेल झाली होती.उन्हाळ्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. शिवाय जादा बसेस सोडल्या जात आहे. या बसेस तंदुरुस्त असाव्या अशा सूचना मध्यवर्ती कार्यालयाने यंत्र विभागासह विभाग नियंत्रकांना केल्या आहे. मात्र यवतमाळ विभागात याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत आहे. मार्गात बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.शुक्रवारी बाभूळगावहून यवतमाळकडे निघालेल्या चार बसेस करळगाव घाट ते पिंपळगाव बायपासपर्यंत फेल पडल्या होत्या. फेल पडण्याची विविध कारणे सांगितली जात आहेत. पिंपळगावजवळ बंद पडलेल्या एम.एच.४०/एन-९५४५ या क्रमांकाच्या बसचे रेडिएटर हीट झाल्याचे सांगण्यात आले. करळगाव घाटात सकाळी १० वाजता बंद पडलेल्या एम.एच.०६/एस-८९३९ या बसच्या ब्रेकमध्ये बिघाड निर्माण झाला होता. तिसरी चांदूररेल्वे आगाराची बस सकाळी घाटात नादुरुस्त झाली. दुरुस्तीसाठी कुणीही न पोहोचल्याने दुपारी १२.३० च्या सुमारास चालकाने हिम्मत करून परत नेली.नादुरुस्त झालेल्या बसविषयी माहिती देऊनही यंत्र विभागाची यंत्रणा तत्काळ पोहोचत नसल्याचा अनुभव चालक-वाहकांना येत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले अधिकारी यंत्र अभियंता आहे. तरीही लालपरीचे हाल सुरू आहे. यात प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :state transportएसटी