लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धामणगाव मार्गावरील मोहा फाटा परिसरात देशी कट्ट्यासह तिघांना शहर ठाण्याच्या शोध पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य सूत्रधार मात्र पसार झाला.विक्की गजानन बोरकर (२२), मंगेश श्रीराम कोडापे (२५) दोघे रा. खडकसावंगा ता. बाभूळगाव, भगावन नारायण विधाते (२६) रा. राणी अमरावती ता. बाभूळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याचा मुख्य सूत्रधार पंकज मंडाले रा. पंचगव्हाण हा अंधाराचा फायाद घेऊन पसार झाला. हे चौघे एकाच दुचाकीवरून यवतमाळकडे येते होते. त्यांना सापळा रचून शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांची अंग झडती घेतली असता विक्की बोरकर याच्या पॅटमध्ये एक देशी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व एक दुचाकी असा ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन क्षीरसागर, रवी आडे, निलेश भुसे, मोहमंद अलताफ, सागर सिडाम, सचिन राठोड, निलेश घोसे यांनी केली. गुन्ह्याचा अधीक तपास सहायक निरीक्षक मिनल कोयल करत आहे. पसार सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत.
मोहा फाट्यावर देशी पिस्टलसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:27 IST
धामणगाव मार्गावरील मोहा फाटा परिसरात देशी कट्ट्यासह तिघांना शहर ठाण्याच्या शोध पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य सूत्रधार मात्र पसार झाला.
मोहा फाट्यावर देशी पिस्टलसह तिघांना अटक
ठळक मुद्देसूत्रधार फरार : शहर ठाणे शोध पथकाचा सापळा