शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

आर्णी तालुक्यात मनरेगा योजनेचे तीनतेरा

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो.

आर्णी : शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. या महत्त्वाकांक्षी योजनेला काही ठिकाणी ठेकेदारांनीच सुरुंग लावल्याचे दिसून येते. मजुरांना काम देण्याऐवजी ठेकेदारांना काम वाटप केल्यामुळे या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्णी तालुक्यात या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून झालेल्या कामांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत विविध कामे मशीनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून ही कामे केली आहे. या योजनेंतर्गत पंचायत समिती आर्णी, वन विभाग आर्णीच्या माध्यमातून मागील सत्रात माती नाला बांध, सिमेंट प्लग, पांदण रस्ते, भूमिगत बांध, शोषखड्डे, नाला सरळीकरण आदी कामे करण्यात आली. वास्तविक पाहता ही कामे मजुरांच्या माध्यमातून करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता काही ठेकेदारांनी ही कामे करीत असताना मशीनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मजुरांचा हक्काचा रोजगार मात्र हिरावला गेला आहे. या योजनेंतर्गत वर्षातील १०० दिवस मजुरांना रोजगार द्यावाच लागतो. यासाठी शासनाच्यावतीने जॉब कार्डही तयार करण्यात आले. मात्र हे जॉबकार्ड कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. मजुरांना काही मोबदला देवून त्यांचे जॉबकार्ड ठेकेदार स्वत:कडे ठेवतात. या प्रकारे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमतातून सुरुंग लागला आहे. ग्रामपातळीवर सरपंच व सचिवाला हाताशी धरून या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ केला आहे. लाखो रुपयांची कामे मशीनने उरकविल्यानंतर याची देयके मात्र ठेकेदारांनी लाटली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बोगस व कंत्राटदाराच्या परिवारातील नातेवाईकांची नावे मजूर म्हणून नोंदविण्यात आली आहे. विशेषत: वन विभागामध्ये हा गैरप्रकार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. राजकीय पाठबळाचा वापर करून कामाचे कंत्राट घेण्यात आल्यामुळे याकडे अधिकार्‍यांनी पाहिजे तसे लक्ष दिले नाही. विविध विभागातून करण्यात आलेल्या या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. तालुक्यामध्ये ठेकेदाराची एक विशिष्ट चेन निर्माण झाली असून ही ठेकेदारमंडळी अधिकार्‍यांना मॅनेज करून कामाचा पुरता बट्ट्याबोळ करीत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला ठेकेदारांनी सुरुंग लावल्यामुळे मजुरांचा रोजगार मात्र हिरावल्या गेला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील मजुरांनी रोजगार भत्त्याची मागणी केली आहे. याची निष्पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व त्यांचे बँक अकाऊंट तपासावे, अशीसुद्धा मागणी जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)