शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

झरीतील अनेक गावांवर घोंगावतेयं पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:35 IST

झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांचे होणार हाल : उपाययोजनांसाठी प्रशासनाची धडपड

ऑनलाईन लोकमतझरी : झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तालुक्यातील नदी, नाले, विहिरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई नसली तरी मार्चअखेर व एप्रिल महिन्यात पाणी टंचाईला काही गावांना तोंंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाई संदर्भात अजुनपर्यंत कुठल्याही गावचा प्रस्ताव आला नाही. निर्माण होणाºया समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमचा विभाग सज्ज आहे, असे गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.झरी तालुक्यातील सावळी, गाडेघाट, रायपूर, झमकोला, निंबादेवी खुर्द, मुकुटबन, नवीन हिरापूर, बैलमपूर, मांडवा ही संभाव्य पाणी टंचाईची गावे आहेत. हिरापूर या गावात नळयोजना सुरू आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. या गावांमध्ये पाण्याचा अन्य स्त्रोत नाही.पाटण येथे नदीवरून दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा सुरू आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होतो. पैनगंगेचे ही पाणी आटण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये पाणी समस्या जटील बनणार आहे. गारगोटी या ५०० लोकसंख्येच्या वस्तीत दोन बोरवेल आहेत. त्यांपैकी एका बोरवेलला पाणी कमी आहे. येथे सोलरपंप होता, तो बंद पडला आहे.झरी येथे आता नगरपंचायत झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असताना पाण्यासंदर्भात समाधानकारक व्यवस्था न केल्यामुळे आता नगरपंचायती पुढे मोठे आव्हान आहे. १४ व्या वित्तयोजनेअंतर्गत वॉर्ड नंबर ९ ते १७ मध्ये पाईपलाईनचे काम सुरू आहे. वॉर्ड ३,४,८ मधील कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरूवात होईल, असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूनम कळम्बे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिरोला हे गाव याच नगरपंचयतीअंतर्गत असून त्या गावचा पाणी प्रश्ना सोडविण्यासाठी मांगुर्ला या गावातून पाईपलाईनने मांगुर्ला येथे पाण्याची व्यवस्था केली आहे.झरी व शिरोला येथे जलशुद्धीकरणाची व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. या संदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे नगराध्यक्ष मंदा सिडाम यांनी सांगितले. यासाठी १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.३६ गावांत बोअरवेलचे काम पूर्णपाणी टंचाईची धास्ती घेऊन अडेगाव, डोंगरगावसह एकूण ३६ गावांत १४ व्या वित्त आयोगातून विंधन विहिरी तयार करण्यात येऊन काही प्रमाणात समस्या शिथिल करण्यात आली आहे. मात्र मेमध्ये या गावांनाही पाणी समस्या भेडसावणार आहे. झरी तालुक्यातील दाभाडी, मांडवा ही गावे नेहमी पाणी टंचाईग्रस्त होती. मांडवा या गावाने यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कारदेखील घातला होता. यावर्षी मांडवा या गावात एम.आर.जी.एसअंतर्गत दोन बोरवेल तयार करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये या बोरवेलचे पाणी आटले तर गावाबाहेरच्या विहिरीतला गाळ उपसून त्यातून एखादी टाकी बसवून त्यातून पाणी सप्लाय करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

टॅग्स :Waterपाणी