शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

यवतमाळ जिल्ह्यात रस्त्याची हजारो कोटींची कामे मंजूर - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 19:11 IST

रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यवतमाळ -  रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.वणी येथे राष्ट्रीय महामार्ग 930, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय व्यवस्थापक एम. चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी उपस्थित होते.यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतक-यांना सिंचनाची सोय आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. शेतीमध्ये नवनवीन संशोधनाची गरज आहे. शेतउत्पादनावर भविष्यात पेट्रोल, डिझेल, गॅस निर्माण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणा-या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पराट्या, तुराट्या, ज्वारीचे फड, सोयाबीनचे कुटार आदी बायोमासपासून सेकंड जनरेशन इथेनॉल आणि बायो सीएनजी तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.बांबूपासून शर्ट, फर्निचर, लोणचं, पेपर, प्लायवूड आणि बायो इथेनॉल तयार करता येते. त्यामुळे बांबुची लागवड करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बांबु आता गवत या प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे बांबु तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. बायोसीएनजी सारखे प्रकल्प यवतमाळ-वणी भागात सुरू करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेतील कंपनीच्या सहाय्याने भद्रावतीला कोळशापासून युरिया तयार करण्याचे तंत्रज्ञान आणले आहे. वणी भागात कोळसा असल्यामुळे येथे मिथेनॉलचे उद्योग उभे राहू शकतात. राज्यातील जलसंवर्धनाबाबत गडकरी म्हणाले, सिंचनासाठी राज्याला 1 लक्ष कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रकल्प आहे. भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ब्रिज कम बंधा-याची काम हाती घ्यावी. यवतमाळमध्ये सेंद्रीय शेतीची कामे चांगली आहे. त्यासाठी नवनवीन संशोधन समजून घेण्याची गरज आहे. शेतीवरचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात विविध क्षेत्रात एकूण 5 लक्ष कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार सुरेश धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा जिल्ह्यातील वणी येथील राष्ट्रीय महामार्ग 930 वर वरोरा ते  वणी एकूण 18.31 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा टप्पा वरोरापासून 313.850 किमी ते  332.160 किमी पर्यंतचा आहे. या महामार्गाचे कामकाज ईपीसी म्हणजेच इंजिनीअरींग खरेदी आणि बांधकाम या तत्वावर करण्यात येणार आहे. चार पदरी असणाऱ्या या महामार्गासाठी एकूण 584.58 कोटी निधी लागणार असून भुमी अधिग्रहणासाठी 312.69 कोटी असे एकूण 904.25 कोटी रुपयांची तरतुद केलेली आहे. याअंतर्गत वर्धा नदीवरील एक मोठा पुल, तीन लहान पुल, वरोरा बायपासवर एक रेल ओव्हरब्रिज, जांब ते चंद्रपुर वाहतूक अबाधित राहावी यासाठी वरोरा बायपासच्या आरंभ बिंदुजवळ एक उड्डाण पूल प्रस्तावित आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र