डॉक्टरांचे ‘थर्टी फर्स्ट’ ३० डिसेंबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:10+5:30

नागपुरातील या चार बारबालांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे दोन लाख रुपयांचा अ‍ॅडव्हॉन्सही देण्यात आला आहे. त्यांना आणण्याची जबाबदारी ‘राजू’ नामक केअरटेकरने घेतली आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था एका फ्लॅटवर करण्यात आली आहे. ३० डिसेंबरची ही पार्टी खासगी इमारतीतच केली जाणार आहे.

Thirty-first of doctor's on December 30 | डॉक्टरांचे ‘थर्टी फर्स्ट’ ३० डिसेंबरलाच

डॉक्टरांचे ‘थर्टी फर्स्ट’ ३० डिसेंबरलाच

Next
ठळक मुद्देपोलिसांची नजर चुकविण्याचा फंडा : नागपुरातील चार बारबालांचे ‘बुकींग’, दोन लाख अ‍ॅडव्हॉन्सही दिला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ३१ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांचा वॉच राहत असल्याने यवतमाळातील चार डॉक्टरांनी आपला ‘थर्टी फर्स्ट’ एक दिवस आधी अर्थात ३० डिसेंबरलाच साजरा करण्याचे ‘नियोजन’ केले आहे. त्यासाठी नागपुरातील चार बारबालांना खास निमंत्रित केले जाणार आहे.
नागपुरातील या चार बारबालांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे दोन लाख रुपयांचा अ‍ॅडव्हॉन्सही देण्यात आला आहे. त्यांना आणण्याची जबाबदारी ‘राजू’ नामक केअरटेकरने घेतली आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था एका फ्लॅटवर करण्यात आली आहे. ३० डिसेंबरची ही पार्टी खासगी इमारतीतच केली जाणार आहे. हॉटेलांवर पोलिसांचा वॉच राहत असल्याने त्यांची नजर चुकविण्यासाठी या डॉक्टरांनी ही सावधगिरी बाळगली आहे. या पार्टीसाठी जंगी व्यवस्था केली जात आहे.
दारूचे ब्रॅन्ड, मच्छीचे प्रकार, कुकही ठरले
त्या बारबाला दोन दिवस यवतमाळात मुक्कामी राहणार आहे. त्यांचा संपूर्ण खर्च हे डॉक्टर करणार आहेत. दारूचे खास ब्रॅन्ड, मच्छीचे विशिष्ट प्रकार आणण्याच्या ऑर्डर दिल्या गेल्या आहेत. एवढेच नव्हेतर चविष्ट भोजन बनविण्यासाठी नामांकित कूकही रिझर्व्ह करण्यात आला आहे.
चार डॉक्टरांनी नियोजन केलेल्या या ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशन पार्टीची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा होऊ लागली आहे. दारू व नॉनव्हेज हे पार्टीतील रुटीन असले तरी यावेळी खास बारबाला आणल्या जात असल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहे. यावरून हे डॉक्टर किती ‘आंबट शौकिन’ आहेत याचा अंदाज येतो.
प्रतिष्ठितांमधील ‘एक्सचेंज’चीही चर्चा
या आंबट शौकिनांचे यवतमाळातील कुंटणखान्यांशी कनेक्शन असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अलिकडेच पडलेल्या कुंटणखान्यावरील धाडीत तसाही वैद्यकीय क्षेत्रातील काही चेहऱ्यांवर पोलिसांना संशय आहेच. मात्र त्यांना रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ सुरू असल्याचे सांगितले जाते. परंंतु अशा चेहºयांची ‘कुंडली’ पोलिसांनी आधीच गोळा केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीतांच्या ‘एक्सचेंज’चे किस्सेही चर्चिले जात आहे.

कुंटणखाना कनेक्शन : हॉस्पिटलमधील यंत्रणेवर संशय
यवतमाळात अनेक ठिकाणी कुंटणखाने चालविले जातात. दारव्हा रोडवरील एका कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. काही हॉस्पिटलमधील यंत्रणा या कुंटणखान्यांशी कनेक्ट असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. शिवाजी गार्डन परिसरातील एका डॉक्टरकडे कार्यरत कर्मचारी अशाच पद्धतीने ‘चमडी’च्या या व्यवसायात कनेक्ट होती. डॉक्टरलाही त्याबाबत संशय होताच. मात्र त्यांनी विचारणा करण्यापूर्वीच त्या महिलेने वेगळे कारण सांगून जॉब सोडला. हा प्रकार माहीत असलेली यंत्रणा अद्यापही त्या डॉक्टरकडे कार्यरत आहे, हे विशेष ! त्यामुळे या डॉक्टरभोवतीच संशयाचे वलय निर्माण झाले आहे. त्यातून कौटुंबिक वादही उद्भवत असल्याचे बोलले जाते. अशा यंत्रणेला पाठीशी घालण्यात डॉक्टरांचा ‘इन्टरेस्ट’ काय? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Web Title: Thirty-first of doctor's on December 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर