पुसद : येथील दिग्रस मार्गावर असलेल्या गोडाऊनचे शटर तोडून ३५ क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. या गुन्ह्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून, मुद्देमालासह हिंगोली येथील एका आरोपीला अटक केली आहे. नीरज विजय भांगडे याच्या दिग्रस मार्गावर असलेल्या शेतातील गोडाऊनचे शटर तोडून दोन महिन्यापूर्वी सोयाबीनचे पोते लंपास केले होते. या प्रकरणाचा पुसद पोलिसांनी छडा लावला असून, हिंगोली येथील आरोपी चंदनलाल सूरजलाल जयस्वाल रा. शिवाजी नगर याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश सोनुने यांनी हा तपास केला. यात जमादार प्रकाश ठाकरे, पंकज पातुरकर, रोहिदास चव्हाण, युवराज चव्हाण यांनी सहभाग घेतला. आरोपीला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. याच गुन्ह्यातील रामा उर्फ काळ््या मतल्या पवार, दिनेश उर्फ दिन्या गणपत काळे, बालाजी गणपत काळे, मंगल भुराजी काळे, सुभाष बंटी काळे या पाच जणांनी चोरी केल्याची कबुली जयस्वालने दिली आहे. हे पाचही आरोपी परभणी कारागृहात असल्याने त्यांना लवकरच या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
चोरीच्या ३५ क्विंटल सोयाबीनसह चोरट्यांना अटक
By admin | Updated: March 30, 2015 02:02 IST