शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे लिपिकेचा पतीच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:10 IST

स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली.योगेश रमेश पटेल (३९) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी यवतमाळ रेल्वे स्थानकावर कार्यरत आहे. त्यामुळे रेल्वेच्या कॅश काऊंटरवर त्याची नेहमी ये-जा होती. येथील कॅश, तिजोरीच्या चाव्या कुठे असतात याची माहिती असल्याने त्याने बुधवारी गुन्हा केला. याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. शिवाय घटनास्थळावर रेल्वेच्या तिकीट काऊंटरचे मुख्य गेट तोडून आरोपीने तिजोरी फोडली नाही तर ती सहज उघडलेली दिसली. हा धागा पकडून तपास सुरू केला.आरोपी यवतमाळात दारव्हा नाका परिसरात असल्याची माहिती मिळताच मूर्तिजापूर रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन टोळीविरोधी पथकाने सापळा रचला. शुक्रवारी आरोपीला ताब्यात घेतले असता, त्याच्या जवळ रोख १५ हजार व एक मोबाईल मिळाला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चोरीच्या रकमे पैकी २ लाख २५ हजार रूपये बँक खात्यात जमा केल्याचे सांगितले. यावरून त्याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :Thiefचोरrailwayरेल्वे